'आमचं आई-बाप बनण्याचं स्वप्नच आता कोळसा झालं...' वाचा भंडारा दुर्घटनेतली करुणकथा

'आमचं आई-बाप बनण्याचं स्वप्नच आता कोळसा झालं...' वाचा भंडारा दुर्घटनेतली करुणकथा

भंडाऱ्यात झालेली अमानवी आग दुर्घटना सगळ्यांनाच हादरवणारी ठरली. आता या घटनेत होरपळलेल्या सामान्य माणसांच्या कथा समोर येत आहेत.

  • Share this:

भंडारा, 12 जानेवारी : भंडाऱ्यात झालेल्या अग्नितांडवाच्या क्रूरतेनं सगळा देश गलबलला. कोवळ्या जीवांची राख झाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांचा टाहो कुणालाच ऐकवत नव्हता.

चाळीशीतले हिरालाल भनारकर आणि त्यांची पत्नी हिरकन्या हे दोघेही भूमिहीन मजूर आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याच्या उचगाव इथं राहणारे. त्यांचं निष्पाप बाळसुद्धा या आगीत खाक झालं. चारवेळा मृत बालकं जन्माला आल्यानंतर हे बाळ हिरकन्याच्या ओटीत पडलं होतं. मात्र आता दोघांचीही पालक बनण्याची स्वप्नंही याच आगीत जळाली आहेत. Indian Express नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हिरालाल सांगतात, 'आमचं लग्न झालं 2006 मध्ये. माझी बायको चार वेळा गर्भार राहिली. पण आमच्या नशिबात बाळ नव्हतं. चारही वेळा मृत बाळं जन्माला  आली. काही वेळा अकाली जन्म झाला, तर काही वेळा नऊ महिने भरल्यावरही बाळ जिवंत राहिलं नाही.'

(हे वाचा- रतन टाटांचा आणखी एक PHOTO व्हायरल, कारण वाचून तुम्हीही कराल त्यांच्या साधेपणाला सलाम)

मग हे जोडपं लखनी या तालुक्याच्या ठिकाणी एका डॉक्टरांकडे गेलं. इथं डॉक्टरांनी हिरकन्यावर उपचार सुरू केले. मात्र उपचारानंतरही यावेळी प्रिमॅच्युअर बाळंतपण झालं आणि मुलगी जन्मली. केवळ एक किलो वजन असलेल्या त्या बाळाला घेऊन दोघांनीही भंडारा जिल्हा जिल्हा रुग्णालयात  धाव घेतली. आणि नवजात बालक अतिदक्षता केंद्रात मुलीला ठेवण्यात आलं. हा दिवस होता 6 जानेवारी. आणि 9 जानेवारीला भनारकर दांपत्याची आई-वडिल बनण्याची स्वप्नं जाळून खाक झाली.

(हे वाचा-छेड काढणाऱ्या रोमिओला चपलांनी बदडलं, तरुणीनं केलेल्या धुलाईचा पाहा VIDEO)

'आता आम्हाला काय वाटतंय याची कुणीच कल्पनाही करू शकणार नाही. आमचं जग उद्ध्वस्त झालं आहे. बायकोच्या उपचारासाठी लागणारा पैसा जमवायला मी दिवसरात्र काम करायचो. तीस हजार रुपये आम्ही खर्च केले. आता सगळं व्यर्थ ठरलं.' हिरालाल यांची अशी प्रतिक्रिया हेलावून टाकणारी होती.

हिरकन्याला मोठाच धक्का बसला आहे. तिला एकोडी इथल्या  केंद्रात दाखल केलं आहे. महाराष्ट्र शासनानं या दांपत्याला ५ लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.

Published by: News18 Desk
First published: January 13, 2021, 2:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading