मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /गळ्यात फास अडकलेला वाघ 10 दिवसांपासून भटकतोय, भुकेमुळे मृत्यू झाल्याची भीती

गळ्यात फास अडकलेला वाघ 10 दिवसांपासून भटकतोय, भुकेमुळे मृत्यू झाल्याची भीती


फासामुळे वाघाचा गळा दबलेल्या अवस्थेत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत तो शिकार करून मांस खाऊ शकणार नाही'

फासामुळे वाघाचा गळा दबलेल्या अवस्थेत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत तो शिकार करून मांस खाऊ शकणार नाही'

फासामुळे वाघाचा गळा दबलेल्या अवस्थेत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत तो शिकार करून मांस खाऊ शकणार नाही'

हैदर शेख,प्रतिनिधी

वरोरा, 01 जून :चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील सालोरी वनक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या आणि पळसगावला लागून असलेल्या जंगलात शिकऱ्यांचा फास अडकलेल्या वाघाला (Tiger) गळफास मुक्त करण्यात वनाधिकारी दहा दिवसानंतरही अपयशी ठरले आहे. त्यामुळे या वाघाचा भुके वाचून मृत्यू होण्याची भीती वर्तवली जात आहे.

वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सालोरी बीटमध्ये  ताडोबा अभयारण्या लगतच्या पळसगाव या गावाचे पुनर्वसन केले गेले आहे. या गावाला लागून असलेल्या जंगलात 22 मे रोजी रक्त सांडून असल्याचे वनरक्षकाला आढळून  आल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी त्या परिसरात  ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यात दि 23 मे रोजी सायंकाळी पट्टेदार वाघ कैद झाला होता. त्याच्या गळ्यात लाल रंगाची वायर दिसून आली होती. त्याच परिसरात वन अधिकाऱ्यांना शिकारी वापरत असलेल्या वायरचा दुसरा तुकडा मिळून आला. तो देखील तसाच व लाल रंगाचा होता. यामुळे वाघाच्या गळ्यातील तो वायर म्हणजे  शिकाऱ्यांनी लावलेला फासच असल्याचे स्पष्ट झाले होते.

Pune: प्लास्टीकचा डब्यात अडकलं कुत्र्याचं तोंड, अग्निशमन दलाच्या जवानांनी सोडवलं

त्या फासामुळे वाघाचा गळा दबलेल्या अवस्थेत असल्याचे फोटोमध्ये दिसत असल्याने तसंच अशा परिस्थितीत तो वाघ शिकार करून मांस खाऊ शकणार नसल्याने त्याची प्रकृती गंभीर असण्याची शक्यता आहे. यामुळे वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे वाढविण्यात आले होते. परंतु, मागील पाच दिवसात कोणत्याही ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाला नसल्याचे म्हटले जाते आणि या बाबतची खरी माहिती लपवून ठेवली जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, सदर घटनेला आज दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला असल्याने वाघाचा त्वरित शोध घेऊन त्याला गळफास मुक्त करणे अगत्याचे झाले आहे. अन्यथा त्याचा भुकेने मृत्यू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वाघाचे लोकेशन मिळाले

शिकाऱ्यांचा फास अडकलेल्या वाघाचा शोध वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नियमितपणे घेतला जात असून यासाठी वरोरा व भद्रावती दोन्ही तालुक्यातील वन अधिकारी काम करीत आहे. लवकरात लवकर त्या वाघाचा शोध घेऊन त्याला गळफास मुक्त केले जाईल असा विश्वास विभागीय वन अधिकारी सारिका जगताप व्यक्त केला.

First published:
top videos

    Tags: Chandrapur, Tiger, Tiger attack