Home /News /maharashtra /

Eknath Shinde Shiv sena : एकनाथ शिंदेसेनेकडून आमदारांचे निलंबण वाचवण्यासाठी वकिलांची टीम तयार, शिंदे पलटवार करणार

Eknath Shinde Shiv sena : एकनाथ शिंदेसेनेकडून आमदारांचे निलंबण वाचवण्यासाठी वकिलांची टीम तयार, शिंदे पलटवार करणार

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडाचा आजचा 5 वा दिवस आहे दरम्यान सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाकडून मोठ्या हालचाली सुरू आहेत.

  मुंबई, 25 जून : एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडाचा आजचा 5 वा दिवस आहे दरम्यान सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाकडून मोठ्या हालचाली सुरू आहेत. आज एकनाथ शिंदे यांच्या बैठकीवर सरकार स्थापनेबाबत खुलासा होण्याची शक्यता आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांनी वकिलांची (eknath shinde shivsena) टीम तयार केल्याचे समजते आहे. यानुसार एकनाथ शिंदे कायदेतज्ञांना (eknath shinde get advice in advocate) भेटणार असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचे विधानसभा उपसभापती (Deputy Speaker of the Maharashtra Legislative Assembly) 16 बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची शक्यता आहे. यामुळे एकनाथ शिंदे हे कायदेविषयक आणि तांत्रिक बाबींवर चर्चा करणार असल्याचे माहिती मिळत आहे. दरम्यान शिंदे गटाकडून आधीच उपसभापतींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

  दरम्यान शिंदे गटाच चर्चेसाठी एक शिष्टमंडळ तयार होणार आहे. यासाठीच्या वाटाघाटीचं बडोदा हे मुख्य केंद्र असणार आहे. याकरता बडोदासाठीही शिष्टमंडळ रवाना केलं जाणार आहे. या शिष्टमंडळात शंभूराज देसाई, दादा भुसे, भरत गोगावले, बच्चु कडू यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिष्टमंडळात प्रवक्तेपदीदेखील असणार आहेत.

  हे ही वाचा : 'तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा' इंदोरीकर महाराजांनी कार्यकर्त्यांचे उपटले कान VIDEO

  शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 च्या आमदार फोडून सुरत व्हाया गुवाहाटी गाठले आहे. मागील पाच दिवसांपासून हे बंडखोरांचे नाट्य सुरू आहे. गुवाहाटीमधील ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि सेनेचे आमदार तळ ठोकून आहे. खुद्द आसामधील भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी घेत असल्यामुळे पूर्ण मदत करत असल्याचे समोर आले आहे. एकंदरीतच सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना सध्या वेग आला आहे.

  एकनाथ शिंदे हे आधी गुजरातमधील सुरतमध्ये मुक्कामी होते. पण, महाराष्ट्रापासून अंतर जवळ असल्यामुळे दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे एकनाथ शिंदे हे सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीला रवाना झाले होते. यावेळी भाजपचे नेते सुद्धा सोबत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंच्या बंडाला रसद आणि सुरक्षा पुरवत असल्याचे समोर आले आहे.

  हे ही वाचा : एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, स्पेशल टीम पडणार गुवाहाटीबाहेर, पुन्हा गुजरात मुख्य केंद्र

  एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास हा अतिशय संघर्षाचा होता. रिक्षाचालक ते आता बंडखोर शिवसैनिक असा हा प्रवास सोपा नव्हता. मात्र, आता परिस्थितीत बदलली आहे. एकनाथ शिंदे यांची संपत्ती जाणून तुम्हाला याची कल्पना येईलच.

  2019मध्ये एकनाथ शिदे यांच्याकडे एकूण सात गाड्या होत्या. या सर्व गाड्यांची एकत्रित किंमत 46 लाख रुपये इतकी होती. यात स्कॉर्पिओ, बोलेरो, इनोव्हा, अरमाडा, टेम्पो या गाड्यांचा समावेश होता. प्रत्येकी दोन स्कॉर्पिओ आणि इनोव्हा तर प्रत्येकी एक बोलेरो, आरमाडा आणि टेम्पो एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. याशिवाय एक पिस्तूल आणि एक रिव्हॉल्व्हरही आपल्याकडे असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या