मुंबई, 25 फेब्रुवारी : राज्याची राजधानी मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शहरातील एका हाय प्रोफाइल परिसरात स्फोटकं ठेवलेली कार आढळल्याने खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच ATS चे अधिकारी आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं आणि गाडी सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहे.
पेडर रोड परिसरातील कारमायकल रोडवर ही स्फोटकं ठेवलेली गाडी आढळली. गाडीत जिलेटीनच्या 20 कांड्या सापडल्या आहेत. महाराष्ट्र ATS च्या पथकाने गाडीची कसून तपासणी केली. त्यानंतर गाडी सुरक्षित स्थळी हलवण्यात आली. आता पोलीस CCTV कॅमेऱ्यावरून पुढचा तपास करत आहे. गाडीच्या नंबर प्लेटवरून मालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या परिसरात अनेक नामांकित लोकांची घरे असल्याने नेमकं कोणत्या उद्देशाने ही गाडी तिथे उभी कऱण्यात आली होती, हे शोधून काढण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
गाडी नो पार्किंगमध्ये उभा असल्याने ट्रॅफिक हवालदाराने 1 वाजता गाडीला जॅमर लावला होता. स्फोटकं असलेली ही गाडी दुपारी 12 वाजल्या पासून घटनास्थळी उभी होती. 6 वाजताच्या दरम्यान पोलिसांना संशय आल्याने बॉम्ब शोधक पथकाला बोलावण्यात आलं.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. 'मुंबईत एका स्कॉर्पिओ व्हॅनमध्ये जिलेटिनच्या 20 कांड्या सापडल्या आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई क्राइम ब्रँच करते आहे. लवकरात लवकर सत्य समोर येईल", असं गृहमंत्री म्हणाले.
(ही बातमी अपडेट होत आहे)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.