• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • भाजपच्या मोठ्या नेत्याचा खास माणूस वानखेडेंना भेटतो, मलिकांचा आणखी एक खुलासा

भाजपच्या मोठ्या नेत्याचा खास माणूस वानखेडेंना भेटतो, मलिकांचा आणखी एक खुलासा

  'समीर वानखेडे यांनी 100 पेक्षा जास्त लोकांना 26 खोट्या केसेसमध्ये अडकवले आहे आणि काही जणांना अटक केली आहे.

'समीर वानखेडे यांनी 100 पेक्षा जास्त लोकांना 26 खोट्या केसेसमध्ये अडकवले आहे आणि काही जणांना अटक केली आहे.

'समीर वानखेडे यांनी 100 पेक्षा जास्त लोकांना 26 खोट्या केसेसमध्ये अडकवले आहे आणि काही जणांना अटक केली आहे.

  • Share this:
नागपूर, 29 ऑक्टोबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी एकापाठोपाठ आरोपांची मालिका सुरू केल्यामुळे एकच धुरळा उडाला आहे. 'भाजपचा (bjp) एक मोठ्या नेत्याचा जवळचा माणूस रोज तिकडे जातो. पोपट वाचवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे' असा घणाघाती आरोप नवाब मलिक (nawab malik) यांनी केला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा आर्यन खान अटक प्रकरणावरून भाजप आणि एनसीबीवर जोरदार निशाणा साधला. 'पोपटाचा धंदा माझा नाही. देवेंद्र फडणवीस यांचा पोपट चिठ्ठ्या काढत आहे आणि भविष्यवाणी करत आहे.  भविष्यवाणी आणि पोपट ज्यांचा धंदा आहे ते पोपट असू शकता. नवाब मलिक होऊ शकत नाही, असा सणसणीत टोला मलिक यांनी फडणवीस यांना लगावला. अल्गोरिदम आणि इतर प्रक्रियांची माहिती द्या',सरकारने Facebook कडे मागितली माहिती 'मी अजून एक माहिती देतोय. वानखेडे यांनी ज्या काही केसेस केल्या. त्याची संख्या बघा दोन ग्रॅम ,चार ग्रॅम, पाच ग्रॅम आहे. एका केसमध्ये 30 सेलिब्रिटींना बोलवले मात्र कुठलीही अटक नाही. हे सगळं खंडणीसाठी केले. भाजपच एक मोठ्या नेत्याचा जवळचा माणूस रोज तिकडे जातो. मी विधिमंडळात याबाबत पटलावर ठेवले आहे, असंही मलिक यांनी सांगितलं. 'समीर वानखेडे यांनी 100 पेक्षा जास्त लोकांना 26 खोट्या केसेसमध्ये अडकवले आहे आणि काही जणांना अटक केली आहे. ncb चे अधिकारी खंडणी मागत आहे. अनुराग कश्यप यांनी त्यांचे अनुभव सांगितले. अशा अनेकांना त्यांनी  अडकवले, असा आरोपही मलिक यांनी केला. अमृता फडणवीस यांचं आलं नवीन गाणं, सोनू निगमने लावला सूर, VIDEO एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर यांना विनंती करतो. ठराविक लोकांकडून माहिती घेऊ नको. योग्य माहिती घेऊन चौकशी करा. निष्पाप नायजेरियन नागरिकाला अडकवले गेले आहे. या प्रकरणी आता ज्ञानेश्वर यांना लेखी पत्र लिहणार आहे, असंही मलिक यांनी सांगितलं. बॉलिवूडला ड्रग्सचा अड्डा बनल्याचे चित्र तयार केले.याकरता राज्यातील भाजपचा हात आहे. योगी नोएडा येथे फिल्म सिटी बनवत आहे त्याकरता भाजपात असलेले कलाकार प्रयत्न आहे, असंही मलिक म्हणाले.
Published by:sachin Salve
First published: