ऑस्ट्रेलियन पर्यटकांना घेऊन जाणारा रिक्षा घाटात उलटला, 3 जण जखमी

ऑस्ट्रेलियन पर्यटकांना घेऊन जाणारा रिक्षा घाटात उलटला, 3 जण जखमी

रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन पर्यटकांच्या ऑटो रिक्षाला अपघात झाला

  • Share this:

रायगड, 08 जानेवारी : रायगड जिल्ह्यातील आंबेत घाटात रिक्षचा अपघात झाला. या अपघातात  ऑस्ट्रेलियन पर्यटक जखमी झाले आहे. जखमी पर्यटकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन पर्यटकांच्या ऑटो रिक्षाला अपघात झाला.  या रिक्षेत ऑस्ट्रेलियनपर्यटक प्रवास करत असताना हा अपघात घडला.  घाटाच्या वळणदार रस्त्यावर चालकाचा रिक्षेवरील ताबा सुटला. त्यानंतर रिक्षा थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात जाऊन कोसळला.  या रिक्षेत बसलेल्या तीन ऑस्ट्रेलियन पर्यटकांना दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक आणि इतर प्रवाशांनी तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलं. रायगड इथं उपचार घेतल्यानंतर तिन्ही पर्यटकांना पुढील उपचारासाठी मुंबई इथं हलवण्यात आलं आहे.

एसटी बसचा ताबा सुटला, कंटेनरला धडकली

दरम्यान, मुंबई नाशिक महामार्गावर पडघाजवळ एसटी बसला अपघात झाला. नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडघाजवळ भरधाव एसटी बसवरील  चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले आहे.

पनवेल आगाराची एसटी बस प्रवाशांना घेऊन धुळे येथे निघाली होती. ही बस भोईरगाव येथील साईधारा कॉम्पलेक्स या ठिकाणी आली पोहोचली तेव्हा रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली. त्यामुळे झालेल्या अपघातात चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींवर पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे.

नागपूरमध्ये 'मुळशी पॅटर्न', त्याने आधी एकाला संपवलं मग गँगने भोजनालयात घुसून घेतला बदला

पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीवर मुळशी पॅटर्न सिनेमा चांगलाच गाजला. दोन गँगमधील बदला आणि सुडाचे रक्तरंजीत चित्र या सिनेमात दाखवण्यात आले तशीच एक घटना नागपूरमध्ये घडली.  साथीदाराच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शहरातील वनदेवीनगरमधील आर. के. सावजी भोजनालयात चाकूने वार करून गुन्हेगाराची निर्घृण हत्या करण्यात आली.

समीर ऊर्फ बाबा या गुन्हेगाराची मंगळवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. मे २०१७ मध्ये समीर आणि त्याचा साथीदार फरदीन खान मुजीब खान ऊर्फ शेर खान या दोघांनी कुख्यात प्रवीण ऊर्फ प्रकाश (वय २२) याची हत्या केली होती. त्यामुळे प्रवीण याचे साथीदार संतापले होते. समीर याचा खून करण्याची शपथ त्यांनी घेतली होती. त्यामुळे प्रवीण याच्या साथीदारांनी समीर याचा काटा काढण्याच्या कट आखला.

मंगळवारी रात्री समीर हा वनदेवीनगर भागात एकटा असल्याची माहिती मिळताच मारेकरी त्याचा पाठलाग करायला लागले. बचावासाठी समीर आर. के. सावजी भोजनालयात घुसला. प्रवीणचे साथीदारही त्याच्या मागोमाग भोजनालयात घुसले. चाकूने सपासप वार करून समीरची हत्या केली आणि पसार झाले. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा तिथे पोहोचला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

दगडाने ठेचून हत्या

दरम्यान, शहरामध्ये दोन हत्याकांडाने खळबळ उडाली असतानाच मंगळवारी रात्रीच्या सुमारास खुनाची घटना वाठोडा पोलीस स्टेशनअंतर्गत गंगा सेलिब्रेशन परिसरात रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. दगडाने डोके ठेचून २५ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. मृतकाची ओळख पटलेली नाही. तो मजूर असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2020 05:55 PM IST

ताज्या बातम्या