मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सांगली तशी चांगली, आईला झाला कोरोना, नवजात बाळाचा सांभाळ करते मैत्रीण!

सांगली तशी चांगली, आईला झाला कोरोना, नवजात बाळाचा सांभाळ करते मैत्रीण!

 डॉक्टरांनी बाळाला कोरोनाबाधित मातेपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला.

डॉक्टरांनी बाळाला कोरोनाबाधित मातेपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला.

डॉक्टरांनी बाळाला कोरोनाबाधित मातेपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला.

सांगली, 25 एप्रिल : कोरोना (Corona) जागतिक महामारीत माणुसकी लोप पावत आहे की, काय अशी भीती व्यक्त होत असताना सांगलीच्या (Sangali) कडेगावात एक आदर्श उदाहरण पाहण्यास मिळालं आहे. एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे तिच्या नवजात बाळाला (New Born beby) अकरा दिवसांपासून शेजारी राहणारी मैत्रीण सांभाळ करीत आहेत.

कडेगाव शहरांतील आझाद चौकात ऐश्वर्या वेल्हाळ आपल्या कुटुंबीयासोबत राहतात. तर त्यांच्या शेजारी राहत असलेल्या एका कुटुंबातील पाचपैकी बाळाच्या मातेसह तिघांना कोरोनाची लागण झाली आहे.  या बाळाची माता ही कोरोनाबाधित असतानाच त्यांना कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कन्यारत्न झाले. आई कोरोनाबाधित तर निरोगी बाळाची तब्बेत काहीशी नाजूक असल्याने नवजात बाळाला हॉस्पिटलमध्ये अकरा दिवस काचेमध्ये ठेवले. त्यानंतर मातेला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी डॉक्टरांनी बाळाला कोरोनाबाधित मातेपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला.

घरबसल्या दुरुस्त करून मिळणार स्मार्टफोन आणि टॅब; Samsung ची 46 शहरांमध्ये सुविधा

त्यामुळे बाळाच्या मातेने आपल्या शेजारी राहत असलेली मैत्रीण ऐश्वर्या वेल्हाळ यांना आपल्या बाळाचा सांभाळ करण्याबाबत विनंती केली. त्यावेळी ऐश्वर्या यांनी कसलाही विचार न करता अकराव्या दिवसाच्या बाळाचा सांभाळ करण्याचे मान्य केले. त्यांना पती अनिकेत व सासरे बाळासाहेब वेल्हाळ यांचेसह संपुर्ण कुटुंबीयांनीही सहमती दर्शवली.

कोरोनाला हरवायचय! तणावात नैराश्य झटकून उभे राहा; या टीप्स देतील नवी दिशा

अशा रीतीने ऐश्वर्या या बाळाचा अकराव्या दिवसापासून ते आज 20 दिवस झाले सांभाळ करीत आहेत. त्या बाळाला दररोज न्हाऊ-खाऊ घालत असून त्याला मातेचे प्रेम दिले आहे. तसंच त्या बाळाला किरकोळ आरोग्याची तक्रार निर्माण झाली तरी त्याला दवाखान्यात नेणे औषधोपचार करणे सर्व काही त्या करीत आहेत. त्यांच्या मायेच्या व प्रेमाच्या सावलीत संबंधित बाळ आता चांगलेच बाळसेदार झाले आहे.संकटसमयी त्यांनी घालून दिलेला हा आदर्श सर्वांना निश्चितच प्रेरणादायी आहे.

First published: