मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : हीच ती कार! विनायक मेटेंचा 3 ऑगस्टला पाठलाग करणाऱ्या गाडीचा फोटो आला समोर

BREAKING : हीच ती कार! विनायक मेटेंचा 3 ऑगस्टला पाठलाग करणाऱ्या गाडीचा फोटो आला समोर

 3 ऑगस्ट रोजी शिक्रापूर इथं दोन गाड्यांनी पाठलाग केला होता

3 ऑगस्ट रोजी शिक्रापूर इथं दोन गाड्यांनी पाठलाग केला होता

3 ऑगस्ट रोजी शिक्रापूर इथं दोन गाड्यांनी पाठलाग केला होता

बीड, 16 ऑगस्ट :  शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे (vinayak mete death case)  अपघाती प्रकरणी आता धक्कादायक खुलासा झाला आहे. मेटे यांच्या सहकऱ्यांनी 3 ऑगस्टला मुंबई पुणे एक्स्प्रेसवर एका कारने पाठलाग केल्याचा आरोप केला आहे. अखेरीस ज्या गाडीने मेटे यांच्या गाडीचा पाठलाग केला होता, त्या गाडीचा फोटो समोर आला आहे. विनायक मेटे यांचं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) 14 ऑगस्ट रोजी अपघाती निधन झालं. पण 3 ऑगस्ट रोजी शिक्रापूर इथं दोन गाड्यांनी पाठलाग केला होता, असा खुलासा मेटेंचे  सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या या आरोपानंतर ज्या इर्टिगा गाडीने पाठलाग केला होता. त्या गाडीची ओळख पटली आहे. MH -TD-8239 असा या गाडीचा नंबर आहे. 3 ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांचा पाठलाग करणारी हीच गाडी होती असा दावा अण्णासाहेब मायकर यांनी केला आहे. 3 ऑगस्टला शिक्रापूरजवळ काय घडलं होतं? तीन ऑगस्टला बीडमधून मुंबईला निघालो होतो,  रात्री 11.30 वाजता शिक्रापूरजवळ पोहोचलो होतो. एक गाडी आमचा पाठलाग करत होती. समोर आयशर ट्रक होता. त्या गाडीतली माणसं आम्हाला हात करून गाडी थांबवण्यासाठी इशारा करत होते. पण, मेटे साहेबांनी गाडी थांबवण्यास नकार दिला, गाडी आयशर ट्रकच्या मागेच ठेवण्यास सांगितले होते. पुढे एक छोटे गाव आलं, तिथे या गाडीने आमच्या गाडीला जोरात कट मारला आणि निघून गेले. मग आम्ही आयशर ट्रकला मागे टाकून पुढे निघून गेलो, अशी माहिती मायकर यांनी दिली. जी गाडी आमचा पाठलाग करत होती, त्यामध्ये पाठीमागे एक जण बसलेला होता. तर पुढच्या सीटवर एक जण बसलेला होता. ड्रायव्हर मिळून अशी तीन माणसं त्या गाडीमध्ये होती, असंही मायकर यांनी सांगितलं. विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटेंनी व्यक्त केला संशय दरम्यान,   या प्रकरणावर न्यूज18 लोकमतशी बोलताना मेटेंच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'काही गोष्टी अनाकलनिय आहे, त्या गोष्टींचे सत्य समोर आले पाहिजे. 3 तारखेला गाडीने पाठलाग केला होता. पोलिसांनी आता एक गाडी गुजरातमधून ताब्यात घेतली आहे. आता ती गाडी आणि अपघात झाल्यानंतर सापडलेली गाडी समान आहे का पाहावी लागेल' असं ज्योती मेटे म्हणाल्या. 'ज्या दिवशी विनायक मेटे यांचा अपघात झाला होता, त्यावेळी मला फोन आला होता. ती वेळ बघितली तर मृत्यू आधीच झाला होता.  मला या गोष्टींचा उल्लेख झाला पाहिजे. गाडीचा ड्रायव्हर आहे तो सगळं सांगू शकतो किंवा पोलीस तपासातून समोर आलं पाहिजे.  आमच्या कुटुंबीयांची हीच मागणी आहे, या प्रकरणातील सत्य समोर आले पाहिजे. मुख्यमंत्री शिंदे यांनी एक  समिती नेमली आहे, पोलीस तपासातून खरं काय सत्य समोर आले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
First published:

पुढील बातम्या