मृताला जिवंत करण्यासाठी दहा दिवस चर्चमध्ये ठेवला मृतदेह

मृताला जिवंत करण्यासाठी दहा दिवस चर्चमध्ये ठेवला मृतदेह

कॅन्सरमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. पण त्या तरूणावर अंत्यसंस्कार न करता, तो पुन्हा जिवंत होण्यासाठी तरूणाचा मृतदेह तब्बल दहा दिवस चर्चमध्ये ठेवण्यात आला. अंबरनाथच्या जीजस फॉर ऑल नेशन्स चर्चमध्ये घडलेली घटना ऐकून कोणालाही धक्का बसेल.

  • Share this:

अंबरनाथ, 07 नोव्हेंबर: काळानुरूप आपण बदलतोय पण काही लोकं मात्र बदलायला अजिबात तयार नाहीत. अंधश्रद्धेची परिसीमा गाठणारी बातमी ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ शहरातली आहे. कॅन्सरमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. पण त्या तरूणावर अंत्यसंस्कार न करता, तो पुन्हा जिवंत होण्यासाठी तरूणाचा मृतदेह तब्बल दहा दिवस चर्चमध्ये ठेवण्यात आला. अंबरनाथच्या जीजस फॉर ऑल नेशन्स चर्चमध्ये घडलेली घटना ऐकून कोणालाही धक्का बसेल.

मुंबईतल्या चिंचपोकळीमध्ये राहणाऱ्या 17 वर्षाच्या मिशाख नेव्हिसचा 27 ऑक्टोबरला कॅन्सरमुळे मृत्यू झाला. मात्र बिशप असलेल्या वडिलांनी मिशाखवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्याचा मृतदेह 10 दिवस चर्चमध्ये ठेवला. प्रार्थना केल्यास मुलगा पुन्हा जिवंत होईल, या गैरसमजातून वडिलांनी मृतदेह नागपाड्यातील चर्चमध्ये ठेवला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चर्चमध्ये धाव घेतली. अखेर पोलिसांच्या समुपदेशनानंतर मिशाख नेव्हिसचा मृतदेह पुन्हा नागपाड्याला हलवण्यात आला. चर्चमध्ये नेऊन तिथे ४ तारखेपर्यंत प्रार्थना केली. याद्वारे आपला मुलगा पुन्हा जिवंत होईल, असं त्यांचा प्रयत्न होता. मात्र याबाबत बोभाटा झाल्यानं नागपाडा पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार केलं. त्यानुसार काल पहाटे ५ वाजता ते मुलाचा मृतदेह घेऊन निघाले, मात्र अंत्यसंस्कार करण्याऐवजी थेट अंबरनाथच्या चर्चमध्ये आले आणि तिथे १७ तास मृतदेह ठेऊन प्रार्थना सुरू केली. याबाबत अंबरनाथ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चर्चमध्ये धाव घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा या मुलाचे कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन मुंबईला रवाना झाले. मात्र त्यांनी अंत्यसंस्कार केले? की तिकडे जाऊन पुन्हा प्रार्थना सुरू केली? याबाबत माहिती समोर येऊ शकलेली नाही.

अंधश्रद्धेच्या परिसिमेबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेवर टीका केलीय.

First Published: Nov 7, 2017 11:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading