पत्नी आणि मुलीचा खून करून पतीने केली आत्महत्या

पत्नी आणि मुलीचा खून करून पतीने केली आत्महत्या

सुभाष श्यामराव आनुसे वय (35) रा.उंबरे वेळापूर (चांडकाचीवाडी) यांचा पिलीव घाटात पत्नी स्वातीसह त्यांच्या दोन मुलींचा मृतदेह आढळून आला आहे.

  • Share this:

पंढरपूर,12 डिसेंबर:  काळीज पिळवटून टाकणारी घटना पंढरपुरात घडली आहे.  आपल्या पत्नी आणि मुलीला मारून एका माणसाने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

सुभाष श्यामराव आनुसे वय (35) रा.उंबरे वेळापूर (चांडकाचीवाडी) यांचा  पिलीव घाटात पत्नी स्वातीसह त्यांच्या दोन मुलींचा मृतदेह आढळून आला आहे.

पत्नी स्वातीला दगडाने ठेचून मारण्यात आलं होतं.  तर मुलगी सविता आणि प्राजक्ताला फासावर लटकवण्यात आलं होतं. तर सुभाष आनुसेने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली आहे.

सुभाष अानुसे हे वेळापूर जवळील उंबरे या गावचे रहिवासी आहेत. या चौघांचे मृतदेह पिलीव घाटात आज मंगळवारी आढळुन आलेत. याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. पण मृत्यूचे ठोस कारण कळू शकलेलं नाही.  तसंच  ही हत्या सुभाष अनुसे यांनी करुन स्वतः आत्महत्या केली का दुसऱ्या कोणी या चौघांची हत्या केली हे अजून स्षप्ट झालेलं नाही.  मात्र या घटनेने माळशिरस तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

याप्रकरणी पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2017 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading