एसटी कर्मचाऱ्याने उद्धव ठाकरेंकडे केली रावतेंची तक्रार

एसटी कर्मचाऱ्याने उद्धव ठाकरेंकडे केली रावतेंची तक्रार

सचिन आगे या कर्मचाऱ्याने फोनवर उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला.सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सध्या राज्यभर सुरू आहे. अशातच संपकऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची रावतेंनी धमकी दिली आहे.

  • Share this:

मुंबई,18 ऑक्टोबर: एसटी कर्मचाऱ्यांचा संप ऐन दिवाळीच्या तोंडावर चिघळला असतानाच आता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची तक्रारच एका एसटी कर्मचाऱ्याने उद्वव ठाकरे यांच्याकडे केली आहे.सचिन आगे असं या कर्मचाऱ्याचं नाव असून उद्धव ठाकरेंवर आपला विश्वास असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

सचिन आगे या कर्मचाऱ्याने फोनवर उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला.सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सध्या राज्यभर सुरू आहे. अशातच संपकऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची रावतेंनी धमकी दिली आहे. यामुळेच बीडमधील सचिन आगे यांनी उद्धव यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यातच आपण रावतेंना समज दिली असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.तसंच उद्धव ठाकरे यांनी आगे यांना थोड धीर धरण्याचा सल्ला दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी सचिन आगे यांना दिली आहे. या दोघांची संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

आता यानंतर तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: October 18, 2017, 7:01 PM IST

ताज्या बातम्या