150 फूट उंच वीजेच्या टॉवरवर चढला मनोरुग्ण, अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

150 फूट उंच वीजेच्या टॉवरवर चढला मनोरुग्ण, अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

सदर व्यक्ती सुरुवातीला पोलिसांच्याही आवाहनाला दाद देत नसल्याने आता करायचं तरी काय, असा प्रश्न सर्वांसमोरच निर्माण झाला.

  • Share this:

अनिस शेख, मावळ, 3 जुलै : देहूरोड पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महावितरण कंपनीच्या अतिउच्च दाबाच्या वीज वाहक दीडशे फूट उंच टॉवरवर एक चाळीस वर्षीय मनोरुग्ण इसम चढला असल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती.

महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेकांनी याबाबत दूरध्वनीवरून पोलिसांना कळवले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत लाऊड स्पीकरच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीस टॉवरवरून सुरक्षितपणे खाली उतरण्याची विनंती केली. मात्र पोलिसांच्या विनंतीहीनंतरही ही व्यक्ती खाली उतरण्यास तयार नव्हती. त्यामुळे सर्वांचीच धाकधुक वाढली होती. सदर व्यक्ती सुरुवातीला पोलिसांच्याही आवाहनाला दाद देत नसल्याने आता करायचं तरी काय, असा प्रश्न सर्वांसमोरच निर्माण झाला.

हेही वाचा - भयंकर! बलात्काराला विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीला जिवंत जाळलं, पण त्याला आली नाही दया

अखेर तब्बल दोन तासानंतर टॉवरवरील व्यक्ती खाली उतरली. हा संपूर्ण प्रकार पाहण्यासाठी मुंबई-बंगलोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रथम दर्शनी तो व्यक्ती मनोरुग्ण असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. सदर व्यक्तीस ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: July 3, 2020, 11:16 PM IST
Tags: dehumaval

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading