Home /News /maharashtra /

माता न तू वैरणी, नवजात बाळाला पिशवीतून टाकून काढला पळ

माता न तू वैरणी, नवजात बाळाला पिशवीतून टाकून काढला पळ

नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बाळ ताब्यात घेतले. घटनास्थळाची पाहणी केली असता सदरील बाळ हे जखमी अवस्थेत होते.

तुळजापूर, 29 ऑक्टोबर : उस्मानाबाद (Osmanabad )जिल्ह्यातील तुळजापूर (Tuljapur) तालुक्यातील बाबळगाव तलावाजवळ पुरुष जातीचे नवजात अर्भक (New Born Baby) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. जखमी अवस्थेत असलेल्या या बाळाला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाबळगाव तलावाजवळ बुधवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान टोल नाका परिसरात हा प्रकार घडला. पेट्रोलिंग करत असताना वाहनचालक बालाजी हिप्परगे यांना एका पिशवीतून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी पिशवी उघडून पाहिले असता,  नवजात बाळ आढळून आले. त्यानंतर बालाजी हिप्परगे यांनी तात्काळ नळदुर्ग पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. सामान्यांना मोठा झटका! आता या बँकेत पैसे जमा करण्यासाठीही द्यावे लागणार शुल्क नळदुर्ग पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेऊन बाळ ताब्यात घेतले. घटनास्थळाची पाहणी केली असता सदरील बाळ हे जखमी अवस्थेत होते. भुकेने रडत असल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी यांनी स्वत:चे दूध पाजले. रडणारे बाळ पाहून मन हेलावले म्हणून महिला कर्मचाऱ्याने स्वत:चे दूध पाजून मातृत्व धर्म निभावला असल्याने त्यांचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे. सदरील बाळ जखमी असल्यामुळे उपचारासाठी  सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे. हे बाळ कुणी आणि का टाकले याचा तपास पोलीस करत आहे. पुण्यात कंचराकुंडीत आढळले नवजात अर्भक दरम्यान, बुधवारी पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात   नुकतंच जन्मलेलं नवजात अर्भक एका निर्दयी मातेनं कचराकुंडीत फेकून दिल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली होती. शहरातील तापकीर मळा परिसरात बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास रस्ते सफाई करत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी नितीन सुर्यवंशी नामक व्यक्तीने या अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यानं कचराकुंडीत बघितलं असता त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. भारतीय सेनेची ताकद वाढणार; शत्रूवर नजर ठेवणार ISRO चं सॅटेलाइट कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक नवजात अर्भक जीवाचा आकांत करत हंबरडा फोडत होतं. निर्दयी मातेनं या नवजात स्त्री जातीचं अर्भक फेकून दिलं होतं. अर्भकावर एकही कपडा नव्हता. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे मुलीची नाळ ठेचून तोडण्यात आल्यामुळे होणाऱ्या वेदनांनी पहाटेच्या थंडीत अर्भक अक्षरशः विव्हळत असल्याचं नितीन सुर्यवंशी यांनी बघितलं. ही बाब त्यांनी तत्काळ स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना कळवून मुलीला सुरक्षितरीत्या पोलिसांच्या स्वाधीन केलं. सध्या या चिमुकलीवर पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती ठणठणीत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Osmanabad

पुढील बातम्या