जुळ्या लेकरांनी कोरोनाला हरवलं, पण आईचे छत्र गमवलं!

जुळ्या लेकरांनी कोरोनाला हरवलं, पण आईचे छत्र गमवलं!

गेल्या 10 वर्षांपासून लेकरांचा चेहरा पाहण्यासाठी संघर्ष करणारी आई मात्र वाचू शकली नाही. आईच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 30 मे : अहमदनगर  येथील शासकीय रुग्णालयात एका कोरोनाबाधित महिलेनं दोन दिवसांपूर्वी दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यापैकी एक मुलगा आणि मुलगी आहे. पण, दुर्दैवीची बाब म्हणजे, कोरोनाबाधित आईचा मृत्यू झाला आहे. या जुळ्या मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याची भीती होती. पण, त्यांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहे. जन्मत:च दोन्ही लेकरांच्या डोक्यावरुन आईचे छत्र हरवल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

घरी लहान पाहुण्याचे आगमन होणार या बातमीने कुटुंबीय अतुर झाले होते.  लग्न झाल्यानंतर 10 वर्षांनी या कुटुंबाच्या घरी पाळणा हलणार होता.त्यामुळे आनंद काही वेगळाच होता. विशेष म्हणजे, ही महिला IBF पद्धतीने गर्भवती राहिली होती. त्यातच कोरोनाचे संकट वाढल्यामुळे कुटुंबीयांना बाळाची आणि आईची जास्त चिंता लागली होती.

हेही वाचा -चंद्रपुरातून धक्कादायक बातमी, क्वारंटाइन सेंटरमध्ये एकाच दिवशी दोघांचा मृत्यू

त्यामुले ही महिला उल्हासनगरहून अहमदनगर जिल्ह्यातील निंबळक येथे आली होती.  त्रास होऊ लागल्याने 24  तारखेला या महिलेला अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर  तिची कोविड-19 चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने महिलेसह कुटुंबियांच्या चिंतेत भर पडली. कुटुंबात कोणालाही कोरोनाचा संसर्ग नसताना या महिलेला लागण झाल्याने कुटुंबीय घाबरून गेले होते.

परिस्थिती नाजूक असल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक मुरणबीकर यांनी नगर अग्रगण्य स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ.जोत्सना डोले यांची मदत घेतली. या महिलेची 28 मे रोजी सिझेरियन प्रसूती करण्यात आली. या महिलेने एक मुलगा आणि मुलीला अशा जुळ्यांना जन्म दिला. बाळांना जन्म दिल्यानंतर दोघांचीही प्रकृती स्थिर होती.

हेही वाचा -दरवर्षी पृथ्वीवर धडकतात 17 हजार उल्का, या भागात सर्वाधिक धोका

कोरोनाबाधित असलेल्या या महिलेला न्यूमॅटिक लक्षणे होती. त्यामुळे या महिलेची प्रसूती झाल्यानंतर आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.  परंतु, आयसीयूमध्ये असताना या महिलेचा 29 मे रोजी सकाळी 8.30 वाजता मृत्यू झाला.

आईची कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे या नवजात शिशुंचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. आज या दोन्ही बाळांचे अहवाल असून दोघांनाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं. मात्र, गेल्या 10 वर्षांपासून लेकरांचा चेहरा पाहण्यासाठी संघर्ष करणारी आई मात्र वाचू शकली नाही. आईच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून या जुळ्या मुलांची प्रसूती केली. पण, आईचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली.

संपादन - सचिन साळवे

First published: May 30, 2020, 1:06 PM IST

ताज्या बातम्या