मृत्यूनंतरही आईने लेकीचा हात सोडला नाही, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, अख्ख गाव रडलं
मृत्यूनंतरही आईने लेकीचा हात सोडला नाही, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, अख्ख गाव रडलं
वर्षभरापूर्वी सुंदर यांचे कोरोनाने निधन झाले होते. पतीच्या जाण्याने आशा सैरभर झाल्या होत्या. गणपतीच्या सणाला त्या मुलगी शांभवीसह माहेरी बाणेगावला आल्या होत्या.
वर्षभरापूर्वी सुंदर यांचे कोरोनाने निधन झाले होते. पतीच्या जाण्याने आशा सैरभर झाल्या होत्या. गणपतीच्या सणाला त्या मुलगी शांभवीसह माहेरी बाणेगावला आल्या होत्या.
बीड, 18 सप्टेंबर : गौरी गणपतीच्या सणाला माहेरी आलेल्या शिक्षिका आणि तिच्या मुलीचा विहिरीत बुडून (drowned ) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीडमधील (beed) बानेगावात घडली आहे. मृतदेह बाहेर काढताना विहिरीतील पाणी उपसल्यानंतर आईच्या कडेवर लेक अन् लेकीचा आईच्या हातात हात होता. हे दृश्य पाहून उपस्थितांनाच्या डोळ्यात पाणी आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आशा सुंदर जाधवर (22)आई व चिमुकली शांभवी सुंदर जाधवर (18 महिने) अशी त्या माय-लेकीची नावे आहेत. दुर्दैवाने आशा यांच्या पतीचे काेरोनामुळे निधन झाल्यामुळे शिक्षिका विरहात होती. माहेरी आल्यानंतर ही दुर्दैवी घटना घटना घडल्याने माय-लेकीच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे.
आशा यांचे बाणेगाव हे माहेर असून त्यांचा विवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील वडजी येथील सुंदर जाधवर यांच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता. आशा व सुंदर हे दोघेही शिक्षक होते. ते पुण्यात राहत असताना वर्षभरापूर्वी सुंदर यांचे कोरोनाने निधन झाले होते. पतीच्या जाण्याने आशा सैरभर झाल्या होत्या. गणपतीच्या सणाला त्या मुलगी शांभवीसह माहेरी बाणेगावला आल्या होत्या. मात्र गुरुवारी वडील बाहेरगावी गेले होते तर आई शेतीकामात व्यस्त होती.
Opinion: नरेंद्र मोदी कल्पना सत्यात उतरवणारा नेता
दुपारी 4 वाजता मुलगी शांभवीला कडेवर घेऊन आशा शेतात गेल्या. यावेळी खेळता-खेळता मुलगी विहिरीजवळ गेली. तिचा तोल गेल्याने धावत जाऊन आशा यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघींचाही बुडुून मृत्यू झाल्याचा गावकऱ्यांनी सांगितलं.
Bigg Boss Marathi 3 : एक लोककलेची राणी आणि दुसरी अदांची खाण; यांना ओळखलं का?
आशा व शांभावी या मायलेकी गायब झाल्याने शोधाशोध सुरू झाला. सायंकाळी सहा वाजता विहिरीच्या काठावर आशा यांची चप्पल आढळली. त्यामुळे त्या दोघी विहिरीत पडल्याची शक्यता गृहित धरुन तरुणांनी विहिरीत उड्या घेतल्या. मात्र, विहीर पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने पाच विद्युतपंपांद्वारे पाणी उपसा सुरू झाला. रात्री साडेअकरा वाजता पाणी उपसा केल्यावर माय-लेकीचे मृतदेह आढळून आले.
रात्री उशिरा मायलेकीचे मृतदेह नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयात पाठविले. 17 सप्टेंबर रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. आज सकाळी ११ वाजता मायलेकीवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघा मायलेकींच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.