• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • परभणी हादरली, अल्पवयीन मुलीवर 3 जणांचा बलात्कार, पीडितेनं विष पिऊन संपवले आयुष्य

परभणी हादरली, अल्पवयीन मुलीवर 3 जणांचा बलात्कार, पीडितेनं विष पिऊन संपवले आयुष्य

सोनपेठ तालुक्यातील 16 वर्षीय मुलीवर त्याच परिसरातील तीन मुले मागील दोन वर्षापासून त्रास देत होते. या नराधमांनी 12 सप्टेंबर रोजी तिला...

सोनपेठ तालुक्यातील 16 वर्षीय मुलीवर त्याच परिसरातील तीन मुले मागील दोन वर्षापासून त्रास देत होते. या नराधमांनी 12 सप्टेंबर रोजी तिला...

सोनपेठ तालुक्यातील 16 वर्षीय मुलीवर त्याच परिसरातील तीन मुले मागील दोन वर्षापासून त्रास देत होते. या नराधमांनी 12 सप्टेंबर रोजी तिला...

  • Share this:
परभणी, 20 सप्टेंबर : अमरावतीमध्ये (amravati) दोन आठवड्याभरापूर्वी अल्पवयीन मुलींवर (minor girl rape case) बलात्काराची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असताना परभणीमध्ये (parbhani) एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार (gang rape) केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, पीडित मुलीने बलात्कारानंतर विष प्राशन (drinking poison ) केलं होतं. आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 12 सप्टेंबर रोजी घडली होती. जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीवर तीन जणांनी बलात्कार केला होता. सोनपेठ तालुक्यातील 16 वर्षीय मुलीवर त्याच परिसरातील तीन मुले मागील दोन वर्षापासून त्रास देत होते. त्यात 12 सप्टेंबर रोजी त्यांनी संबंधित मुलीला तालुक्यातील डिघोळ तांडा परिसरात बोलवून तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलगी घरी गेली तेव्हा तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची हकीकत कुटुंबीयांना सांगितलं. तेव्हा सर्वांना एकच हादरा बसला. नातेवाईकांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रारी दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल  केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणानंतर आपल्यासोबत घडलेल्या प्रकारमुळे पीडित मुलगी अस्वस्थ होती. त्यामुळे पीडित  मुलीने विष प्राशन करून आत्महत्या (committed suicide) करण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला लातूरला हलविण्याचा सल्ला दिला.  मुलीवर सध्या लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू झाले. मुलीचा जबाब देण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आणि त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी, सोनपेठ पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर अन्य एक आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, मुलीचा उपचार दरम्यान लातूर येथे मृत्यू झाला आहे.  पीडित मुलीचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांना एकच आक्रोश केला आहे. आरोपी नराधमांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.
Published by:sachin Salve
First published: