Home /News /maharashtra /

महाविकास आघाडीतील एका मंत्र्याने 'विहंग'चा विषय वृतपत्रात दिला, सरनाईकांचा खळबळजनक खुलासा

महाविकास आघाडीतील एका मंत्र्याने 'विहंग'चा विषय वृतपत्रात दिला, सरनाईकांचा खळबळजनक खुलासा

तर प्रताप सरनाईक यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना सोमय्यांवर पलटवार केला आणि एक धक्कादायक खुलासा केला

तर प्रताप सरनाईक यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना सोमय्यांवर पलटवार केला आणि एक धक्कादायक खुलासा केला

तर प्रताप सरनाईक यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना सोमय्यांवर पलटवार केला आणि एक धक्कादायक खुलासा केला

ठाणे, 14 जानेवारी : 'महाविकास आघाडीतील (mva government) एका मंत्र्यांने जाणीवपुर्वक मंत्रिमंडळात हा विषय येण्याआधी एका वृत्तपत्राला दिला होता' असा खळबळजनक खुलासा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांनी केला आहे. सरनाईक यांच्याबद्दल कुणी माहिती बाहेर काढली आती याबद्दल चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबद्दलची माहिती सेनेचे नेते रामदास कदम यांनी किरीट सोमय्यांना पुरवली असल्याचे प्रकरण समोर आले होते. आता त्यानंतर आता पुन्हा एकदाच असाच प्रकार सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याबद्दल घडला आहे. 'प्रताप सरनाईक यांनी विकासक म्हणून छाबिया विहंग गार्डन (Chhabiya Vihang Garden thane) ही इमारत बांधली होती. त्या इमारतीचा दंड माफ केला गेला कारण प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आमदार आहेत, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) केला होता. तर प्रताप सरनाईक यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना सोमय्यांवर पलटवार केला आणि एक धक्कादायक खुलासा केला “महाविकास आघाडीतील एका मंत्र्यांने जाणीवपुर्वक मंत्रिमंडळात छाबिया विहंग गार्डन इमारतीचा विषय येण्याआधी एका वृत्तपत्राला दिला होता” असं सरनाईक म्हणाले. (फोन कॉलवरून असा चोरी होऊ शकतो तुमचा OTP; Cyber Dost ने पुन्हा केलं अलर्ट) तसंच, 'ठाणे महापालिकेचे तत्कालिन आयुक्त आरए राजू यांची अनेक भ्रष्टाचारी प्रकरण बाहेर काढली होती. बदलापूर आणि  टिटवाळ्यात बांधलेला अनधिकृत बंगला याची प्रकरण बाहेर काढली होती. त्यांनी त्यावेळी दोन शिवसेना नगरसेवकांचे पद रद्द करण्याची नोटीस काढली होती. हॉटेलसमोर जनरेटर आहे म्हणून त्रास देण्याचा प्रकार केला होता. त्यामुळे जाता-जाता विहंग गार्डन येथील शाळा बिल्डरने बांधली होती, तिचे हस्तातंर पालिकेकडे देण्यात आले होते. पण याच बिल्डरने बांधलेल्या विहंग गार्डन इमारतीचे कोणतेही काम अनधिकृत नसताना तीन कोटींचा दंड ठोठावला होता. त्यामुळे राज्य सरकारकडे दाद मागितली होती, अखेरीस हा दंड माफ करण्यात आला आहे, असा खुलासा सरनाईक यांनी केला. 'देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच विहंग इमारतही अनधिकृत नसल्याचा खुलासा केला होता', असंही सरनाईक म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या