मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO रेल्वेच्या ट्रॅकखाली आला प्रवासी आणि सगळ्यांचा श्वास थांबला

VIDEO रेल्वेच्या ट्रॅकखाली आला प्रवासी आणि सगळ्यांचा श्वास थांबला

खाली असलेला प्रवासी आणि भरधाव धावणारी ट्रेन ती काही सेकंद सगळ्यांनाच श्वास रोखून धरणारी ठरली. सगळ्यांना वाटलं आता तो संपला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

खाली असलेला प्रवासी आणि भरधाव धावणारी ट्रेन ती काही सेकंद सगळ्यांनाच श्वास रोखून धरणारी ठरली. सगळ्यांना वाटलं आता तो संपला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

खाली असलेला प्रवासी आणि भरधाव धावणारी ट्रेन ती काही सेकंद सगळ्यांनाच श्वास रोखून धरणारी ठरली. सगळ्यांना वाटलं आता तो संपला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

  मुंबई 27 जून : मुंबईत लोकलचं एक वेगळं महत्त्व आहे. इथल्या स्टेशन्सवर दररोज लाखो लोक ये जा करतात. गर्दी प्रचंड असल्याने इथल्या अपघातांचं प्रमाणही जास्त आहे. पण या अपघातांना जास्त वेळा या मानवी चूकाच कारणीभूत ठरत असल्याचं स्पष्ट होतं. स्टेशनवर स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या मुळे अपघात होतात आणि प्रवाशांना जीव गमवावा लागतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ आसनगाव स्थानकातला आहे. एक प्रवासी रेल्वे ट्रॅक ओलांडत असतानाच अचानक दुसऱ्या बाजून एक्सप्रेस आली. भांबावलेला तो प्रवासी प्लॅटफॉर्म आणि ट्रॅकच्यामध्ये जी जागा असते त्यात फटीत वाकून बसला. प्लॅटफॉर्मवर उभे असणाऱ्या सगळ्यांनी आपला श्वास रोखून धरला होता. खाली असलेला प्रवासी आणि भरधाव धावणारी ट्रेन ती काही सेकंद सगळ्यांनाच श्वास रोखून धरणारी ठरली. सगळ्यांना वाटलं आता तो संपला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ट्रेन गेल्याबरोबर तो प्रवासी त्या जागेतून बाहेर आला आणि लोकांनी सुटेचा नि:श्वास सोडला.
  प्रवासाचा वेळ कामाच्या तासात मोजला जावा, कर्मचाऱ्यांची मागणी
  अनेक शहरांमध्ये नोकरदारांचा बराच वेळ कामावर पोचण्यातच जातो. त्यामुळे आॅफिसमधले तास आणि प्रवासाचे तास असं धरलं तर जास्त वेळ प्रवासातच जातो. मग प्रवासाचा वेळ कामाच्या तासात पकडला गेला तर काय बहार येईल नाही का ? इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुपनं केलेल्या सर्वेक्षणात 61 टक्के चाकरमान्यांनी  प्रवासाचा वेळ हा कामाच्या तासांमध्ये मोजला जावा असं मत व्यक्त केलंय. मुंबई हे चाकरमान्यांचं शहर. इथल्या चाकरमान्यांचं आयुष्य चालतं ते लोकल ट्रेनचं टाईम टाबेल आणि घड्याळाच्या काट्यावर. कारण लोकल चुकली की  दिवसाचं आणि महिन्याच्या पगाराचंही गणित चुकतं. कितीही आटापिटा केला तरी ऑफिसमध्ये वेळेत पोहोचता येईलच याची शाश्वती देता येत नाही. इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुपनं केलेल्या सर्वेक्षणात 80 देशांमधील 15 हजार कर्मचाऱ्यांनी मतं नोंदवली. ऑफिसला जाणाऱ्या 61 टक्के लोकांनी प्रवासाचा वेळ हा कार्यालयीन वेळाचा भाग म्हणून ग्राह्य धरला जावा असं मत व्यक्त केलं. देशातल्या 80 टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कामाच्या वेळांसंदर्भात असणारे निर्बंध शिथिल केले असल्याचं म्हटलंय.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Mumbai railway, Railway accident

  पुढील बातम्या