सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरच्या नावाने भुलली महिला, फसवणूक केल्यानंतर या 'परशा'ला अटक

सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरच्या नावाने भुलली महिला, फसवणूक केल्यानंतर या 'परशा'ला अटक

एखादा अभिनेता थेट आपल्याशी बोलणार असेल तर त्यासारखा आनंद चाहत्याला नाही.

  • Share this:

अहमदनगर, 25 मे : सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्यांबाबत त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आकर्षण असतं. आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी काहीही करण्याची त्यांच्या चाहत्यांची तयारी असते. अशातच एखादा अभिनेता थेट आपल्याशी बोलणार असेल तर त्यासारखा आनंद चाहत्याला नाही. त्यातही तो अभिनेता सैराटसारख्या मराठीतील सर्वात यशस्वी सिनेमातील असेल तर काही सांगायलाच नको. पण अभिनेत्याशी बोलायचा हाच मोह एका महिलेला महागात पडला आहे.

सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून अहमदनगर शहरातील महिलेची फसवणूक करणार्‍या पुण्याच्या एकाला अहमदनगर सायबर सेल पोलिसांनी आज अटक केली आहे. शिवदर्शन नेताजी चव्हाण ऊर्फ शिवतेज (रा. पिंपरी चिंचवडी, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

महिलेकडून घेतलेले मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी पोलिसांनी जप्त केली आहे. एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी या बनावट परशा कडून जप्त केला आहे. एमआयडीसी येथे या महिलेचा चार महिन्यापूर्वी फेसबुकवर सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या बनावट खात्याशी संपर्क आला. पिंपरी-चिंचवड येथील शिवदर्शन हे खाते हाताळत होता. याच खात्यावरून त्याने अहमदनगरमधील महिलेशी मैत्री वाढवली.

आर्थिक अडचण असल्याचा बहाणा करत त्याने महिलेकडून मंगळसूत्र आणि एक अंगठी नगर येथून घेतली. सदर फेसबुक अकाऊंट बंद झाल्या नंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर नगरच्या सायबर सेलने प्रकरणाचा छडा लावत पिंपरी-चिंचवड मधून तोतया परशा अर्थात आरोपी शिवदर्शनला अटक केली आहे. यासंदर्भात सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण परदेशी यांनी माहिती दिली आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 25, 2020, 9:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading