Home /News /maharashtra /

ऐन दिवाळीत रायगडावर शिवभक्ताचा मृत्यू, पायऱ्या चढत असतानाच ह्रदयविकाराचा झटका

ऐन दिवाळीत रायगडावर शिवभक्ताचा मृत्यू, पायऱ्या चढत असतानाच ह्रदयविकाराचा झटका

मुंबईमधून आलेल्या 8 जणांनी रायगडावर पणत्या लावण्यासाठी आज सकाळी नऊ वाजता गड चढण्यास सुरुवात केली होती.

रायगड, 17 नोव्हेंबर : ऐन दिवाळीत रायगडावर शिवभक्ताचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रमेश तुकाराम गुरव असं निधन झालेल्या शिवभक्ताचं नाव आहे. पायऱ्या चढत असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने गुरव यांचा मृत्यू झाला. दिवाळीत रायगडावर दीप प्रज्वलित करण्याची प्रत्येक शिवभक्ताची इच्छा असते. लॉकडाऊननंतर अनलॉक झालेल्या महाराष्ट्रात रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटक यायला सुरुवात झाली होती. मुंबई येथील विद्याविहारमधून आलेल्या 8 जणांनी रायगडावर पणत्या लावण्यासाठी आज सकाळी नऊ वाजता गड चढण्यास सुरुवात केली. हेही वाचा - अपघात की हत्या? पतीनेच पत्नीला 1000 फूट दरीत ढकललं, कुटुंबाच्या आरोपामुळे प्रकरणाला नवं वळण हा संपूर्ण ग्रुप रायगडावर जात असताना काही वेळातच रमेश तुकाराम गुरव यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर महाड ग्रामीण रुग्णालयात आणेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. महाड तालुका पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, दिवाळीसारख्या आनंदाच्या सणामध्येच रायगडावर जाताना एका शिवभक्ताचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसंच यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून पर्यटन करताना आपल्या प्रकृतीचीही काळजी घेण्यात यावी, असं आवाहन केलं जात आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Raigad, Raigad news

पुढील बातम्या