• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • भिवंडी हादरली, माथेफिरूने घरात घुसून 6 जणांवर केले चाकूने सपासप वार, 2 जणांचा मृत्यू

भिवंडी हादरली, माथेफिरूने घरात घुसून 6 जणांवर केले चाकूने सपासप वार, 2 जणांचा मृत्यू

नमाज पूर्वी सर्व घरात असताना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास माथेफेरू आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी याने कमरुजम्मा अन्सारी यांच्या घरात शिरून चाकूने हल्ला केला.

नमाज पूर्वी सर्व घरात असताना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास माथेफेरू आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी याने कमरुजम्मा अन्सारी यांच्या घरात शिरून चाकूने हल्ला केला.

नमाज पूर्वी सर्व घरात असताना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास माथेफेरू आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी याने कमरुजम्मा अन्सारी यांच्या घरात शिरून चाकूने हल्ला केला.

  • Share this:
भिवंडी, 29 ऑक्टोबर : भिवंडी (bhiwandi) शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच तरुणाच्या हत्येची घटना ताजी असताना आज एका माथेफिरू व्यक्तीने सहा जणांवर चाकूने (knife attack) हल्ला केला. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहे. यामध्ये एक मयताची पत्नी व तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील खान कंपाऊंड गैबी नगर येथील रहेमनीया मस्जिद परिसरात ही घटना घडली आहे.  अन्सार उलहक्क अन्सारी असे हल्ला करणाऱ्या माथेफेरूचे नाव असून या हल्ल्यात कमरुजमा मोहम्मद इस्लाम (वय 42) व इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर खान (वय 29) या दोघांची हत्या झाली आहे. वडिलांच्या मृतदेहासोबत मुलीचं हॉट Photo Shoot; सोशल मीडियावरही केले शेअर शुक्रवार असल्याने दुपारच्या नमाज पूर्वी सर्व घरात असताना सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास माथेफेरू आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी याने कमरुजम्मा अन्सारी यांच्या घरात शिरून चाकूने हल्ला केला. घरातील आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारा इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर हा त्याठिकाणी आला. माथेफेरूने त्यावर व घरातील कमरुजमाची पत्नी हसीनाबानो, मुले रेहान, आरिफा व आरीबा यांच्यावर सुद्धा चाकूने हल्ला करीत सर्वांना जखमी केले. त्यानंतर आरोपी परिसरतील आपल्या घरात गेला. परिसरातील नागरिक धावून येत त्यांनी हल्लेखोर असलेल्या घराला बाहेरून कडी लावून कोंडून ठेवले. या घटनेची माहिती शांतीनगर पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी यास त्याच्या घरातून पकडून ताब्यात घेतले. तोंडात तंबाखू असल्याने नीट साक्ष दिली नाही; भडकलेल्या न्यायाधीशांनी ठोठावला दंड तर सर्व जखमींना इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी कमरुजमा मोहम्मद इस्लाम व इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर खान हे मयत झाल्याचे घोषित केले तर जखमी पत्नी व मुलांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात रवाना केले आहे. या हत्त्येच्या गुन्ह्याची नोंद शांतीनगर पोलीस घेत असून या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळत तणावाचे वातावरण निर्माण झाले  आहे. दरम्यान, आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी हा परिसरातील मशिदींसाठी देणगी जमा करण्याचे व हिशेब ठेवण्याचे काम करीत असल्याचे व त्यांच्यात यापूर्वी कोणत्यातरी कारणावरून वाद झाला असल्याची माहिती परिसरातील नागरिक देत आहेत. या घटनेनंतर आमदार महेश चौघुले हे रुग्णालयात दाखल होत त्यांनी आरोपीस कठोरात कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.
Published by:sachin Salve
First published: