अरेरे! पुण्यात आता नवरा-नवरीमध्ये ठेवावं लागणार 3 फुटाचे अंतर, असे आहेत नवे नियम

एकीकडे पुण्यातून ही दिलासादायक बातमी आलेली असताना कोरोनाच्या धोक्यामुळे प्रशासनाला एक वेगळाच निर्णय घ्यावा लागला आहे.

एकीकडे पुण्यातून ही दिलासादायक बातमी आलेली असताना कोरोनाच्या धोक्यामुळे प्रशासनाला एक वेगळाच निर्णय घ्यावा लागला आहे.

  • Share this:
पुणे, 14 मार्च : पुणेकरांसाठी आजचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला आहे. कारण पुण्यातील कोरोना व्हायरसची (coronavirus)लागण झालेल्या दहाही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुण्यातील कोरोनाव्हायरसग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. एकीकडे पुण्यातून ही दिलासादायक बातमी आलेली असताना कोरोनाच्या धोक्यामुळे प्रशासनाला एक वेगळाच निर्णय घ्यावा लागला आहे. सामूहिक लग्नासाठीची एसओपी विभागीय आयुक्तांनी सांगितली आहे. त्यामध्ये वधू आणि वर हे एकमेकांपासून 3 फूट अंतर ठेऊन उभे राहतील. दोघेच आत जातील , नातेवाईकांनी लग्नाला जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, सामूहिक लग्नांबाबत प्रशासनानं हा निर्णय घेतला असताना लोकांमधून एक अनोखी मागणी समोर आली आहे. लग्न रद्द करण्यासाठी मंगल कार्यालयाकडून रिफंड मिळवून देण्याची खात्री द्या अशी मागणी काही नागरिकांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. कोरोनाबद्दल काय आहे राज्यातील स्थिती? राज्यात कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला होता. आतापर्यंत पुण्यात कोरोनाव्हायरसचे एकूण 10 रुग्ण आहेत. तर राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची (covid-19) संख्या वाढली आहे. आता देशात सर्वाधिक coronavirus चे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हेही वाचा- Corona ची 'आपत्ती' - कायदा मोडणाऱ्यांना तुरुंगवास; मृतांच्या कुटुंबांना मिळणार 4 लाख मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये नवे रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या 26 वर पोहोचली आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितलं.
First published: