Home /News /maharashtra /

धक्कादायक प्रकार! धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नसताना मोठ्या संख्येने एकत्र आले जैन साधू

धक्कादायक प्रकार! धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नसताना मोठ्या संख्येने एकत्र आले जैन साधू

कोरोना व्हायरसचा कहर थांबत नसल्याचं पाहून राज्य सरकारनं लॉकडाऊन 5.0 चे संकेत दिले आहेत.

डोंबिवली, 28 मे: कोरोना व्हायरसचा कहर थांबत नसल्याचं पाहून राज्य सरकारनं लॉकडाऊन 5.0 चे संकेत दिले आहेत. दुसरीकडे मात्र, डोंबिललीत एक धक्कादायर प्रकार समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. संचारबंदी लागू असताना डोंबिवलीमधील भोपर येथील लोढा परिसरात जैन मंदिरात गुरुवारी सकाळी अनेक साधू एकत्र आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हे सर्व साधू हे मुंबईमधील कंटेंटमेंट झोनमधून आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेमुळे मात्र, संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हेही वाचा... भाजपच्या माजी महापौराला अटक, खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकावर केला प्राणघातक हल्ला कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून विविध आवाहन केली जात आहेत. त्याच संचारबंदी लागू करण्यात आली असून धार्मिक कार्यक्रमांना बंदी करण्यात आली आहे. असे असूनही डोंबिवली येथील भोपर परिसरात धार्मिक विधीसाठी अनेक साधू मुंबई येथील घाटकोपर या कंटेंटमेंट झोनमधून आल्याचं स्थानिक नागगरिकांनी म्हटलं आहे. हे साधू आले परंतु त्यांनी परवानगी घेतली आहे का? त्यांची कोव्हिड टेस्ट झाली आहे का? आणि जर एखादा साधू कोरोना पॉझिटिव्ह असेल तर याला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. तर वारंवार तक्रार करून देखील पोलिसांनी काही लक्ष दिले नाही आणि जैन साधू मंदिरात आले असल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले. मानपाडा पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आणि साधूंना डोंबिवलीत येण्यात मज्जाव केला असूनही साधू डोंबिवलीत आले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हेही वाचा.. कोरोनाचा कहर थांबता थांबेना! मुंबई महापालिकेतून समोर आली धक्कादायक माहिती लॉकडाऊनमुळे सर्वत्र संचारबंदी असल्याने खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी लोकांना जमण्यास मनाई करण्यात आली आहे. असं असतानाही नियमांचा भंग करून सदर ठिकाणी गर्दी केल्यामुळे ट्रस्टीचा पदाधिकारी भद्रेश जोशी (रा. संदप) यांच्याविरुद्ध कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादाहरी चौरे यांनी दिली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या