Home /News /maharashtra /

नंदुरबारमध्ये खोल दरीत जीप कोसळली, 6 मजूर जागीच ठार

नंदुरबारमध्ये खोल दरीत जीप कोसळली, 6 मजूर जागीच ठार

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अतीदुर्गम भागात मंजुरांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे.

    नंदुरबार, 22 जानेवारी :  नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अतीदुर्गम भागात मंजुरांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू झाल्याचे वृत्तसमोर आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. तोरणमाळ खडकी रस्त्यावर ही घटना घडली आहे. गावातील काही मजुरांना नियमितपणे ही जीप ये जा करत होती. आज सकाळी तोरणमाळ खडकी रस्त्यावर अचानक या जीपला अपघात झाला. अपघातानंतर जीप खोल दरी कोसळली. या भीषण अपघातात जीपचा फक्त सांगडाच उरला आहे. दरीत ठिकठिकाणी मजुरांचे मृतदेह  पडून आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह स्थानिक गावकऱ्यांनी धाव घेतली. दरीत मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर काही जणांचे मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.  घटनास्थळावर मदतकार्य सुरू आहे. म्हसावद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमी मजुरांना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गाडी खोल दरीत कोसळल्याने प्रवाशांचा शोध सुरू आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: नंदुरबार

    पुढील बातम्या