भिवंडी, 29 नोव्हेंबर : भिवंडीमध्ये (Bhiwandi ) एका मॅरेज हॉलमध्ये ( open field marriage hall ) लग्नसमारंभ सुरू होता. यादरम्यान वाहन पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत फटाके (Firecrackers) लावले होते. फटाक्यांची आतिषबाजी करताना मंडपाला आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने आग विझवली.
भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात असलेल्या अंसारी मॅरेज हॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली होती. या आगीत 20 ते 25 दुचाकी वाहने जळाली असून अग्निशमनदलाच्या अथक प्रयत्नांनी दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळाले आहे.
इंग्लंडनंतर भारतीय क्रिकेटमध्येही वर्णद्वेषाचं वादळ, भारतीय स्पिनरचे गंभीर आरोप
या मॅरेज हॉलमध्ये लग्नसमारंभ सुरू होता. यादरम्यान वाहन पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत फटाके लावले होते. फटाक्यांची आतिषबाजी करताना मंडपाला आग लागली. त्यानंतर हळूहळू ही आग पसरून वाहन पार्किंग ठिकाणी असलेल्या सुमारे २० ते २५ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या दीड दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून स्थानिक पोलीस ठाण्यात या आगीची नोंद करण्यात आली आहे.
आयफोनचीही तस्करी, मुंबई विमानतळावर तब्बल 3 हजार 646 iPhones जप्त, किंमत 42 कोटी!
भिवंडीत मोकळ्या जागेत अनेक व्यावसायिकांनी अशा प्रकारे मॅरेज हॉल थाटले आहेत. मात्र सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने भविष्यात जीवितहानी होण्याची मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून मनपा प्रशासन त्याकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.