कोपरगाव, 07 जून : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात मोटरसायकल शोरूमला भीषण आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
कोपरगाव शहरातील येवलारोडला असलेल्या श्रद्धा होंडा शोरूमला रविवार 7 जून रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून आगीत शोरूमचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा -भारतात सप्टेंबरपर्यंत कोरोनाचा नाश करण्यात यश मिळणार, तज्ज्ञांचा दावा
येवलारोड लगत विशाल सरोदे यांचे होंडा शोरूम आहे सकाळी 8 वाजता आगीचे लोळ आणि धूर बाहेर पडल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. नंतर नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अवघ्या 5 मिनिटांत कोपरगाव नगरपालिकेचे अग्निशमन दल पोहोचले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली, शोरूमच्या मागील बाजूस असलेले सर्व्हिस सेंटर पूर्ण जळाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हेही वाचा -
अग्निशमन दलाचे अधिकारी संभाजी कारले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: अहमदनगर