'ही' गोशाळा करते आहे जखमी आणि भाकड गायींचं पालन

'ही' गोशाळा करते आहे जखमी आणि भाकड गायींचं पालन

अशा परिस्थितीत कुठलीही मदत मिळत नसतानाही कोकणातील एक गोशाळा भाकड आणि जखमी गायींचं संरक्षण आणि पालन करते आहे.

  • Share this:

20 फेब्रुवारी: सरकारने राज्यात गो- वंश हत्या बंदी कायदा लागू केलाय.. त्यामुळे भाकड गाईंचं करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. अशा परिस्थितीत कुठलीही मदत मिळत नसतानाही कोकणातील एक गोशाळा भाकड आणि जखमी गायींचं संरक्षण आणि पालन करते आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे परशुराम इथल्या कर्मवीर श्रीहरी भक्त पारायण भगवान कोकरे महाराज यांची श्री. संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान या नावाची एक गोशाळा आहे .ही गोशाळा 2008 साली सुरू झाली. सुरूवातीला या गोशाळेत फक्त 4 गायी होत्या. मात्र आता गोवंश हत्या बंदी नंतर कत्तल खान्याकडे न गेलेल्या आणि अपघातात जखमी झालेल्या अशा 450 गायी गोशाळेत आहेत.

राज्यातील गोशाळांची भयावह स्थिती आहे. गोवंश हत्याबंदी नंतर महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याला 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. पण शासनाकडून अजूनही मदत मिळालेली नाही.

भगवान कोकरे महाराजांच्या गोशाळेमुळे भाकड गायी ज्या शेतकऱ्यांना सांभाळणं होत नाही ते या गोशाळेत आणून सोडतात. पूर्वी कत्तल खाण्याकडे जाणाऱ्या गायी आता गोशाळेत सुरक्षित आहेत.

भगवान कोकरे महाराज आपल्या कीर्तन सेवेतून मिळणाऱ्या देणगीतून गोशाळेतील साडे चारशे भाकड गायीचे संगोपन करतायत. आता गोशाळा चालविण्यासाठी सरकार मदत देणार नसेल तर भाकड गायींचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झालाय.

कधीकाळी कत्तल खान्यांमध्ये जाणाऱ्या गायी आता गोशाळेत जातायेत. पण गोशाळांना मदत करण्याचं धोरण फक्त कागदावरच आहे. त्यामुळे आता गोशाळांना खरंच मदत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: February 20, 2018, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading