14 एप्रिल: नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुरमध्ये वडिलांच्या डोळ्यादेखत वाळू माफियानं मुलीचं अपहरण केलं आहे.या प्रसंगामुळे गावात खळबळ माजली आहे.
राहुरी तालुक्यातील बारागव नांदूर येथे वाळू तस्करी करणाऱ्यांची मोठी दहशत आहे. भरदिवसा वाटेल त्या मुलीचं छेड काढतात. मात्र इथल्या नागरिकांमध्ये या वाळू तस्करींची इतकी दहशत आहे की गुन्हा दाखल करण्यासाठी हिंमत करून शकत नाहीत. वाळू तस्कर किशोर माळी आणि सुभाष माळी यांनी साथीदारांच्या मदतीनं घराबाहेर आईवडिलांसोबत झोपलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गाडीत टाकून पळवून नेलं. तिने आरडाओरड केली.
वडिलांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आरोपी मुलीला घेऊन निघून गेले होते. पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. मात्र असं असतानाही आरोपी किशोर माळी राजरोजपणे फिरताना दिसतोय.. त्यामुळे हैदोस घालणाऱ्या या आरोपींवर कधी कारवाई होणार हा खरा प्रश्न आहे....