पुण्यात पहिलीत शिकणाऱ्या चिमुरडीचं 6 जणांनी केलं लैंगिक शोषण

पुण्यात पहिलीत शिकणाऱ्या चिमुरडीचं 6 जणांनी केलं लैंगिक शोषण

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका १८ वर्षांच्या मुलाला अटक केली असून, अन्य ५ जण अल्पवयीन आहेत. कोंढवा पोलिसांच्या माहितीनुसार हा घृणास्पद प्रकार आॅगस्ट महिन्यापासून सुरू होता

  • Share this:

पुणे, 22 डिसेंबर:  पुण्याच्या  कोंढव्यात मिठानगर येथे एका पहिलीत शिकणाऱ्या चिमुरडीचं ६ जणांनी गेले ५ महिने लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका १८ वर्षांच्या मुलाला अटक केली असून, अन्य ५ जण अल्पवयीन आहेत. कोंढवा पोलिसांच्या माहितीनुसार  हा घृणास्पद प्रकार आॅगस्ट महिन्यापासून सुरू होता. ही मुलगी आणि मुले एकाच वस्तीत  राहतात. त्यातील एक मुलगा 18 वर्षांचा दोन मुलं १० वर्षांची  आहेत. तर  बाकीचे 12,9 आणि व 6 वर्षांचे आहेत.

वस्तीमधील एकाजणीने या मुलीच्या आजीला तिची मुलं छेड काढतात, असं सांगितलं होतं. ही मुलगी वारंवार आजारी पडायची.  गेल्या काही दिवसांपासून ती पोट दुखत असल्याची तक्रार करत होती.

त्यामुळे आजीने तिला एका डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांना तपासणीत या मुलीच्या अंगावर काही रॅशेस दिसून आले. डॉक्टरांनी आपली शंका तिच्या आजीकडे व्यक्त केली.  त्यानंतर आजीने तिच्याकडे चौकशी केली असता तिने मारणार नाही ना, असं घाबरत घाबरत विचारलं.  त्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला.

मुलीने सांगितल्याप्रमाणे ही  मुलं तिला टेरेसवर घेऊन जात असत. तसेच एखाद्याच्या घरात कोणी नसेल तर त्याच्या घरात घेऊन जात असत. आजीने या मुलीच्या वडिलांना हा प्रकार सांगितला आहे.  त्यांनी १८ वर्षांच्या मुलाला जाब विचारता त्याने हा प्रकार कबूल केला आहे.  त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सध्या 18 वर्षांच्या मुलाला अटक झाली असून पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

First published: December 22, 2017, 8:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading