मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /टबमध्ये बुडून 1 वर्षाच्या दुर्वाचा मृत्यू

टबमध्ये बुडून 1 वर्षाच्या दुर्वाचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील  माढा शहरामध्ये शिवाजीनगर भागात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. सायबू मारुती शिंदे हे शिवाजीनगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची सर्वात धाकटी मुलगी दुर्वा घराजवळच खेळत होती

    01 एप्रिल: पाण्याच्या टबमध्ये बुडून चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापुर जिल्ह्यात घडली आहे.  दुर्वा सायबू शिंदे या एक वर्षाच्या बालिकेला प्राण गमवावे लागले आहेत.

    सोलापूर जिल्ह्यातील  माढा शहरामध्ये शिवाजीनगर भागात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. सायबू मारुती शिंदे हे शिवाजीनगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची सर्वात धाकटी मुलगी दुर्वा घराजवळच खेळत होती. त्यावेळी ती पाण्याने भरलेल्या टबमध्ये पडली. शेजाऱ्यांनी दुर्वाला पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दुर्वाला  तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सायबू शिंदे हे आसपासच्या गावांमध्ये यात्रेत हातातील कडं, कानातील कुंडल अशा वस्तू विकून उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी होती. दुर्वाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे.

    First published:
    top videos

      Tags: India, Solapur