औरंगाबाद, 06 जुलै : जिल्ह्यातील चौका घाटातील तलावामध्ये नौकाविहार करत असताना अचानक बोट उलटली. पाण्यात बुडणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या मित्राचाही पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.
फुलंब्री तालुक्यातील चौका घाटातील तलावात रविवारी दुपारी 3 वाजता ही घटना घडली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाउन लागू आहे. त्यामुळे निशांत चंद्रमोरे (वय 35, राहणार सूतगिरणी) आणि अभिजात कुरेकर (वय 37 रा.सिडको) आपल्या कुटुंबीयांसह चौका घाटातील रिसॉर्टवर पोहोचले होते. हा रिसोर्ट सेवानिवृत्त वनअधिकारी ओमप्रकाश चंद्रमोरे यांच्या मालकीचा होता. या रिसॉर्टचे मालक निशांत चंद्रमोरे त्याचे पाच मित्र आणि कुटुंबीयांसोबत रविवारची सुट्टी घालवण्यासाठी आले होते.
'हे सरकार नाही CIRCUS आहे', नितेश राणेंची ठाकरे सरकारवर खरमरीत टीका
रिसॉर्टला लागून असलेल्या तलावात निशांत चंद्रमोरे होडीने नौकाविहार करत होता. तर अभिजात कुरेकर हा दूर होडीच्या काही अंतरावर पोहत होता. अचानक होडी उलटल्यामुळे निशांत पाण्यात बुडाला. हे पाहून अभिजातने निशांतला वाचवण्यासाठी पोहोचला. पण, यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात बदलले काय? शिवसेनेचा घणाघात
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. काही तासात निशांतचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर अभिजातचा मृतदेह आज सकाळी काढण्यात आला. अभिजात कुरेकर हा वास्तूविशारद होता. त्याचबरोबर तो एक उत्तम बाईक रायडर सुद्धा होता. अभिजात आणि निशांत यांच्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहे.
संपादन - सचिन साळवे