नागपूर, 28 डिसेंबर : नागपूरमध्ये (nagpur) गुन्हेगारीच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शहरात मागील 12 तासाच्या आत दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांची हत्या (murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हिंगणा पोलीस (hingana police nagpur) ठाण्याच्या हद्दीत धीरज माकोडे या तरुणाची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली तर दुसऱ्या घटनेत गड्डीगोदम भागात अनिकेत तांबे या तरुणांची हत्या करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणा हद्दीतील घटनेत मित्रांसोबत शेतात ओली पार्टी करायला गेलेल्या तरुणाची किरकोळ वादातून त्याच्याच मित्रांनी हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास गुमगाव शिवारातील एका शेतात घडली. धीरज ज्ञानेश्वर माकोडे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले असून १ आरोपी फरार आहे. आरोपी धीरज रामानुज मिश्रा (वय २४) स्वप्नील नारायण डेकाटे (वय २५),श्रीराम लक्ष्मण ढोले (वय ३६),क्रिष्णा अशोक मेंडुले (वय २६),जितेंद्र पितांबर ढोले( वय ३५) सर्व राहणार गुमगाव ह्यांना हिंगणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या घटनेतील मुख्य आरोपी मंगेश टोंगे हा फरार आहे
(NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर इथे नोकरीची मोठी संधी)
मृतक धीरजचे गुमगावला चिकन सेंटर आहे तर सर्व आरोपी हे त्याचे चांगले मित्र आहेत. या सर्वांनी ओली पार्टी करायचे ठरवले होते. गुमगाव पासून २ किमी अंतरावर असलेल्या एका शेतात सायंकाळी हे सर्व दारू व मटण घेऊन गेले. मृतक धीरज माकोडे ह्याला काही काम असल्याने तो बुटीबोरी ला गेला होता. इकडे उर्वरित सर्व मित्रांनी जेवण शिजविण्यास व सोबतच दारू पिण्यास सुरुवात केली. रात्री उशीरा मृतक सुद्धा तिथे पोहचला त्यावेळी दारू अतिशय कमी उरली होती. उरलेली दारू तो एकटाच पीत असताना मुख्य आरोपी मंगेशने त्याला स्वतःसाठी दारू मागितली यावरून वाद सुरू झाला. हाणामारीत तिथेच पडलेल्या तिक्ष्ण हत्याराने आरोपी मंगेशने धीरजच्या पोटावर वार केला व घटनास्थळा वरून पळ काढला. काही आरोपीही हा प्रकार पाहून पळून गेले.
आरोपी श्रीराम ढोले, क्रिष्णा मेंडुले यांनी जखमीला त्याला गाडीत बसवून मेडिकल रुग्णालयात घेऊन गेले तिथे डॉक्टरांनी धीरजला मृत घोषित केले. इकडे रात्री ११ च्या सुमारास ठाणेदार बळीराम परदेशी यांना सदर घटनेची माहिती मिळाली. काही पोलीस कर्मचाऱ्यांना मेडिकलला पाठवून स्वतः घटनास्थळी पोहोचले. मृतकसोबत आलेल्या आरोंपीनी सुरुवातीला मृतक हा जखमी अवस्थेत गुमगाव पुलाजवळ पडून होता त्याला आम्ही दवाखान्यात घेऊन आलो, असे सांगितले. इकडे पोलिसांना पार्टी विषयी माहिती मिळाली. त्यानंतर पहाटे पोलिसांनी गुमगाव येथूनच पाच आरोपींना ताब्यात घेतले. एक आरोपी मंगेश टोंगे अजूनही फरार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.