जिम करताना काळजी घ्या, ठाण्यात नौदल जवानाचा व्यायाम करताना झाला मृत्यू!

जिम करताना काळजी घ्या, ठाण्यात नौदल जवानाचा व्यायाम करताना झाला मृत्यू!

भिवंडीत माजी नौदल सैनिकाचा जिममध्ये व्यायाम करताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 19 ऑक्टोबर : आताच्या या फॅशन विश्वात जर राहायचं असेल तर फिट आणि आरोग्यदायी असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळेच जण जिम वेडे पाहायला मिळतात. पण जिम करताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील आताही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय नौदलात सेवा बजावून निवृत्त झालेल्या माजी सैनिकाचा जिममध्ये व्यायाम करताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना काल्हेर इथे घडली आहे.

भिवंडीत माजी नौदल सैनिकाचा जिममध्ये व्यायाम करताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. जितेंद्र शांताराम पाटील ( 45 रा. काल्हेर ) असं मृत्यू झालेल्या माजी नौदल सैनिकाचे नांव आहे. सदर सैनिकाने लष्करी सेवा नियमानुसार 15 वर्षे भारतीय नौदलात सेवा बजावून निवृत्ती स्वीकारली होती. त्यानंतर त्यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी पत्करली होती.

इतर बातम्या - 'मी यशश्री बंगला ते मोदींच्या सभेपर्यंत पोहोचले, बाकीचे बारामतीतच आहेत'

गेल्या 6 वर्षांपासून ते इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करत होते. शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी ते रोज सकाळी जिममध्ये व्यायामासाठी जात होते. त्यामुळे ते सकाळी नेहमीप्रमाणे ठाणे येथे जिममध्ये व्यायामासाठी गेले होते. मात्र, व्यायाम करीत असताना त्यांच्या छातीत कळ आली आणि त्यांना घाम फुटून ते जमिनीवर कोसळले. यावेळी जिममध्ये व्यायामासाठी आलेल्या तरुणांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

इतर बातम्या - पैसे चोरल्याचा आरोप सहन न झाला नाही, 12 वर्षाच्या मुलाने उचललं धक्कादायक पाऊल

जितेंद्र यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्ययात्रेत मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. जितेंद्र यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

इतर बातम्या - सलमान खानचा 'शेरा' शिवसेनेत, विधानसभेत महत्त्वाची भूमिका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bhiwandi
First Published: Oct 19, 2019 12:44 PM IST

ताज्या बातम्या