• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मुंबई-नाशिक महामार्गाजवळ वडपे इथं वनजमिनीत पेटला वणवा

मुंबई-नाशिक महामार्गाजवळ वडपे इथं वनजमिनीत पेटला वणवा

भिवंडी तालुक्यातील वडपे ग्रामपंचायत हद्दीतील वडपे खिंड इथं ही घटना घडली.

  • Share this:
भिवंडी, 15 नोव्हेंबर : मुंबई-नाशिक महामार्गावरीलवन जमिनीवर रस्त्यात लावलेल्या आगीमुळे वनवा पेटून काही हेक्टर जमिनीवरील वन संपदा या आगीत भस्म झाली आहे. भिवंडी तालुक्यातील वडपे ग्रामपंचायत हद्दीतील वडपे खिंड इथं ही घटना घडली. महामार्गाजवळ असलेल्या जमिनीवर बऱ्याच वेळा भंगार व टाकाऊ वस्तू पेटवून दिल्या जातात. त्यामुळे नजीकच्या जमिनींवरील गवत व झाडे-झुडपे जळून खाक होत असताना वनविभागाच्या या बाबीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हेही वाचा - न्यायाधीशांनी सरकारी बंगल्यात साडीने गळफास घेऊन केली आत्महत्या; दीड वर्षांपूर्वीच... भातशेतीची कापणी झाल्यानंतर रानोमाळी सर्रासपणे रानटी ससे घोरपड व अन्य वन प्राणी अशा आगीमध्ये होरपळून वनसंपदा सोबतच वन्यजीव संपदा सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीतच वनविभाग या बाबींकडे लक्ष देणार कधी असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
Published by:Akshay Shitole
First published: