Home /News /maharashtra /

गुहेजवळ लावली आग, बाहेर येताच भाल्याने वार करून ठार मारले वाघीणीला, यवतमाळमधील घटना

गुहेजवळ लावली आग, बाहेर येताच भाल्याने वार करून ठार मारले वाघीणीला, यवतमाळमधील घटना

वाघीणीच्या पुढच्या पायाचे पंजे तोडून नेण्यात आले आहे. त्यामुळे शिकारीसाठीच वाघीणीला ठार केल्याचा दाट संशय आहे.

    नरेंद्र मते, प्रतिनिधी यवतमाळ, 26 एप्रिल : यवतमाळ (Yavatmal ) जिल्ह्यातील मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रात एका वाघीणीची (Tiger) निर्घृणपणे शिकार (Hunting) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिकार केल्यानंतर या वाघीणीचे पंजे छाटण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. आज सकाळी पांढरकवडा वनविभागअंतर्गत मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रात राखीव वन कक्ष क्रमांक 30 मध्ये ही घटना घडली आहे. वाघाच्या गुहेजवळ असलेल्या नाल्यात वाघीणीचा मृतदेह आढळून आला आहे. गळ्याला तारेचा फास अडकल्यान आणि तीक्ष्ण हत्याराने वार केल्यामुळे वाघीणीचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. ...तर तुम्ही कोरोना लस घेऊ नका; लस उत्पादक कंपन्यांनीच दिला सल्ला तसंच, वाघाच्या गुहेजवळ आग लावण्यात आली होती. त्यानंतर वाघाला ठार मारण्यात आले.  भाल्याने वार करून वाघीणीला ठार केले असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. हा वाघ मादी वाघ असून अंदाजे 4 वर्ष वयाची असण्याची शक्यता आहे. वाघीणीच्या पुढच्या पायाचे पंजे तोडून नेण्यात आले आहे. त्यामुळे शिकारीसाठीच वाघीणीला ठार केल्याचा दाट संशय आहे.या प्रकरणी प्राथमिक वनगुन्हा जारी करून गुन्ह्याचा तपास सहायक वनसंरक्षक पांडरकवडा हे करित आहेत. काही दिवसांपूर्वीच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असलेल्या मुधोली गावशिवारात वाघाची शिकार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी वाघाच्या 12 मिशा वनविभाग पथकाने केलेल्या तपासणीत प्रकल्पाच्या पदमापूर प्रवेशद्वारावर जप्त केल्या होत्या. कोरोनावर मात करून परतली पत्नी, पतीनं स्वतः औक्षण करत केलं स्वागत मुधोली शिवारात बंडू श्रीरामे या शेतकऱ्याच्या शेतात लावण्यात आलेल्या जिवंत विद्युत तारांचा शॉक लागून 5 वर्षीय नर वाघ  ठार झाला होता. या शेतकऱ्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने नखे-मिशा काढून घेत वाघाचे शव जमिनीत पुरले होते. वाघाच्या मिशा जप्तीनंतर वनविभागाने मोहीम आखून पूरलेल्या स्थळावरून वाघाची हाडे जप्त केली.  या संपूर्ण प्रकरणात मुधोली आणि भामडेळी येथील 4 ग्रामस्थांना अटक करण्यात आली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: यवतमाळ, वाघीण

    पुढील बातम्या