भिवंडी, 13 नोव्हेंबर : भिवंडी (Bhiwandi) शहरातील खोका कंपाऊंड परिसरामध्ये एका कारखान्याला भीषण आग (fire) लागली होती.
कारखान्यात कपड्यांचा मोठ्या प्रमाणात साठा असल्यामुळे आग पसरली होती. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाचे जवानांनी आग आटोक्यात आणली आहे.
भिवंडीतील खोका कंपाऊंड परिसरात यंत्रमाग कारखाना आहे. आज सकाळी अचानक या कारखान्यात आगीचा भडका उडाला. कापडाचा मोठ्या प्रमाणात साठा असल्यामुळे काही क्षणात आगीने रौद्ररुपधारण केले.
या कारखान्याला लागूनच रहिवासी परिसर असल्यामुळे एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण, यश आले नाही. स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.
अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम हाती घेण्यात आले. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. कारखान्यात आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. शॉर्ट सर्किटमध्ये आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ऐन दिवाळीत राजधानीमध्ये कोरोनाचा विस्फोट, मृत्यूच्या आकडेवारीनं मोडला रेकॉर्ड
रहिवासी परिसर असल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना काही काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.