आग लागल्यानंतर काही वेळांनी स्फोटाचा आवाज आला. स्फोटाच्या आवाजाची तीव्रता जास्त असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि एकच धावपळ उडाली. आगीचे लोट शहरात दूरपर्यंत पाहण्यास मिळत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, ही आग कशामुळे लागली, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. आग विझवण्याचे काम सुरू आहे. भिवंडीत नायट्रोजन सिलेंडरचा भीषण स्फोट, 4 कामगार गंभीर जखमी दरम्यान, भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील पारसनाथ कंपाऊंड मधील इजी मॅकेनिकल कंपनीत नायट्रोजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेमध्ये 4 कामगार गंभीर जखमी झाले आहे. जखमी कामगारांना ठाणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या कंपनीत स्टीलचे कटिंग आणि वेल्डिंगचे काम करण्यात येत असून काम सुरू असताना मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत कंपनीबाहेर उभ्या केलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे.#डोंबिवली : सोनारपाडा येथील एका गोडाऊन लागली आग, घटनास्थळी फायरब्रिगेड रवाना pic.twitter.com/UrJCLMLN1w
— sachin salve (@SachinSalve7) December 9, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.