मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बापाच्या अंगात सैतान शिरला, 4 वर्षांच्या मुलाला रेल्वे स्टेशनवर आपटून आपटून ठार मारले, LIVE VIDEO

बापाच्या अंगात सैतान शिरला, 4 वर्षांच्या मुलाला रेल्वे स्टेशनवर आपटून आपटून ठार मारले, LIVE VIDEO

 सकलसिंग पवार याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. या वादातून त्याने स्वतःचा चार वर्षांचा मुलगा प्रशांत याला उचलून फलाटावर आपटले.

सकलसिंग पवार याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. या वादातून त्याने स्वतःचा चार वर्षांचा मुलगा प्रशांत याला उचलून फलाटावर आपटले.

सकलसिंग पवार याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. या वादातून त्याने स्वतःचा चार वर्षांचा मुलगा प्रशांत याला उचलून फलाटावर आपटले.

नवी मुंबई, 21 सप्टेंबर :  दुसऱ्या पत्नीशी वाद झाल्यामुळे एका विकृत बापाने सानपाडा रेल्वे स्थानकावर (sanpada railway station) आपल्याच 4 वर्षीय मुलाचे तीन वेळेस डोके आपटून हत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येची अंगावर शहारे आणणारे दृश्य  सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील(navi mumbai)  सानपाडा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 3 वर ही घटना घडली आहे.  हत्या करणाऱ्या बापाला वाशी जीआरपी यांनी अटक केली आहे. सकलसिंग पवार (sakalshingh pawar) अटक आरोपचे नाव आहे. सानपाडा रेल्वे स्टेशनवर फलाट क्रमांक 3 व 4 दरम्यान हा प्रकार घडला आहे. मूळच्या यवतमाळ येथील भटक्या कुटुंबातील असून सानपाडा पुलाखाली राहत असून, भीक मागून  उदरनिर्वाह करत होता.

आरोपी सकलसिंह पवार आणि पत्नीचे नेहमी वाद होत होते. त्यादिवशी भांडण करत असताना रेल्वे स्थानकावर पोहचले यावेळी फलाटावर सर्व जण एकत्र चालत असताना, सकलसिंग पवार याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. या वादातून त्याने स्वतःचा चार वर्षांचा मुलगा प्रशांत याला उचलून फलाटावर आपटले. यावेळी व्यक्तींनी त्याला अडविण्याचाही प्रयत्न केला, परंतु तो सतत मुलाला उचलून जोराने खाली फेकत होता. अखेर हा क्रूर प्रकार पाहून एका प्रवासी महिलेनेही त्याला अडवून मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही सकलसिंग हा चिमुकल्याला उचलून आपटत राहिल्याने, त्यातच त्याचा मृत्यू झाला.

बॉयफ्रेंड तुझा का माझा गं? म्हणत धरल्या एकमेकींच्या झिंझ्या; तुंबळ हाणामारी

या घटनेप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी सकलसिंग पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मृत प्रशांत हा सकलसिंगच्या पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा आहे. त्याची पहिली पत्नी गावी असून, तो सध्या दुसरी पत्नी मेहेर हिच्यासोबत नवी मुंबईत सानपाडामध्ये राहत आहे. रविवारी रात्रीपासून सकलसिंग याचा दुसरी पत्नी मेहेर हिच्यासोबत वाद सुरू होता.

सोमवारी सकाळी सर्व जण सानपाडा स्थानकात आले असता, त्या ठिकाणीही त्यांचा वाद सुरू होता. याच रागातून सकलसिंग याने मुलगा प्रशांत याला उचलून आपटून त्याची हत्या केली. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याचे माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी दिली आहे.

First published:

Tags: नवी मुंबई