राहुल खंदारे, प्रतिनिधी
बुलडाणा, 10 जुलै : आर्थिक अडचण आणि दुबार तिबार पेरणी करूनही पावसा अभावी पिक उगवले नाही, म्हणून आर्थिक संकट ओढवलेल्या शेतकरी (suicide) दाम्पत्याने विषारी औषध घेऊन आपले जीवन संपवल्याची ह्रदयद्रावक घटना चिखली तालुक्यातील कारखेड येथे घडली. या घटनेने मात्र संपूर्ण बुलडाणा (buldhana) जिल्हा हादरला. या शेतकरी दाम्पत्याने आपल्या राहत्या घरी विष घेतले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या कारखेड येथील 60 वर्षीय शेषराव मंजुळकार आणि 51 वर्षीय जनाबाई मंजुळकार अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. त्यांच्याकडे दोन एकर शेती असून यावर्षी पाऊस पडल्यावर त्यांनी पेरणी केली मात्र ते उगवले नाही, त्यामुळे त्यांनी शेतात दुसऱ्यांदा पेरणी केलीय, मात्र ते उगवलेले असताना ही पावसाअभावी मात्र करपून गेलंय आणि आता तिसऱ्यांदा पेरणी करायची तर त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले.
संस्कारी बाबुजींवर झाले बलात्काराचे आरोप; #MeToo मुळे आलोक नाथ बेरोजगार
दोन्ही वेळा पेरणी केली तर जवळचे पैसे खर्च झाले आणि तिसऱ्यांदा पेरणी कशी करायची या विवंचनेत असल्याने दोघांनी विष घेतले होते. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान जनाबाई यांचा आणि शेषराव मंजुळकार यांचा मृत्यू झाला. या कुटुंबाकडे दोन एकर शेती असून, त्यांना दोन मुले तसंच चार मुली आहेत. या सर्वांची लग्न झालेली आहेत.
4 राशींच्या व्यक्तींचा वीकेंड उत्तम जाणार, पाहा आज तुमच्या राशीत काय?
मंजुळकार दाम्पत्य हे त्यांच्या शेतीसोबतच परिसरात दगड फोडणे आणि मजुरी करणे हा त्यांचा व्यवसाय होता. यावरच त्यांचा प्रपंच चालायचा. शिवाय पत्नी जनाबाई यांना अर्धांगवायू आजार झालेला होता. या सर्व प्रकारामुळे दोघेही चिंताग्रस्त होते आणि याचा त्यांना ताण आला असावा आणि यामध्येच दोघांनी विष घेतले असावे, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलंय. मात्र, या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.