Home /News /maharashtra /

बकऱ्यांना चिरडत भरधाव डंपर घराला धडकला, झोपेत असलेल्या मामा-भाच्याचा जागीच मृत्यू

बकऱ्यांना चिरडत भरधाव डंपर घराला धडकला, झोपेत असलेल्या मामा-भाच्याचा जागीच मृत्यू

रात्री एक ते दीडच्या सुमारास नांदरखेडा गावात ही घटना घडली आहे. या घटनेत गावातील तरुण मामा भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    निलेश पवार, प्रतिनिधी नंदुरबार, 14 ऑक्टोबर : नंदुरबार  तालुक्यातील नांदरखेडा गावाजवळ एका घरामध्ये रेती वाहतूक करणारा भरधाव डंपर घरात घुसल्याची धक्कादायक आणि भीषण घटना घडली. या दुर्घटनेत घरात झोपलेल्या 2 तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्री एक ते दीडच्या सुमारास नांदरखेडा गावात ही घटना घडली आहे. या घटनेत नांदरखेडा गावातील तरुण मामा भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेमध्ये मृत पावलेल्या तरुणांची नावे प्रविण बाबुलाल राठोड आणि विक्रम श्रावण जाधव अशी आहेत. भोसले राजघराण्याच्या 373 वर्ष जुन्या राजवाड्याचा बुरुज ढासळला, VIDEO वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरची नांदरखेडा गावात नेहमी ये जा असते. मंगळवारी रात्री सुद्धा वाळू वाहतूक सुरू होती. तेव्हा अचानक एका डंपरचालकाचा ताबा हा डंपरवरून सुटला. भरधाव डंपरवर नियंत्रण मिळवण्यासाठी चालकाने प्रयत्न केला. पण, त्यात त्याला अपयश आले. त्यानंतर डंपर हा रस्त्यावरून खाली उतरवण्यात आला. पण त्यानंतरही डंपरचा वेग काही कमी झाला नाही.  पुढे जावून हा डंपर घराला धडकला. डंपरचा वेग इतका होता की, त्याने घराचा अर्धा भाग हा जमीनदोस्त केला.  घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी गाड्यांचा चिरडून टाकले. एवढेच नाहीतर दारासमोर बांधलेल्या  आठ ते दहा बकऱ्या देखील चिरडल्या गेल्या आहेत. सीमा देव यांना अल्झायमर, मुलगा अजिंक्यने ट्वीट करून दिली माहिती दरम्यान, या घटनेनंतर सकाळपासूनच संतप्त गावकऱ्यांनी या घटनेप्रकरणी रोष व्यक्त करत काही काळ रस्ता देखील अडवून ठेवला होता. या घटनेमुळे पुन्हा एकदा वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या