मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /डॉक्टर गेले झोपी अन् तर्राट शिपाई करत होता चिमुरडीवर उपचार, पालघरमधला धक्कादायक VIDEO आला समोर

डॉक्टर गेले झोपी अन् तर्राट शिपाई करत होता चिमुरडीवर उपचार, पालघरमधला धक्कादायक VIDEO आला समोर

हा मद्यपी शिपाई चक्क डॉक्टरचा सल्ला न घेताच या चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता

हा मद्यपी शिपाई चक्क डॉक्टरचा सल्ला न घेताच या चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता

हा मद्यपी शिपाई चक्क डॉक्टरचा सल्ला न घेताच या चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रुग्णाच्या सोबत असलेल्या कुटुंबीयांनी त्याला रोखून धारेवर धरलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Palghar, India

राहुल पाटील, प्रतिनिधी

तलासरी, 27 मार्च : पालघर आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ पुन्हा एकदा उघड झाला. आहे तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी शिपायाकडून एका चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची धक्कादायक समोर आली आहे.

हा मद्यपी शिपाई चक्क डॉक्टरचा सल्ला न घेताच या चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रुग्णाच्या सोबत असलेल्या कुटुंबीयांनी त्याला रोखून धारेवर धरलं. आपण मद्य प्राशन केलं असल्याची कबुली या व्हिडिओमध्ये या शिपायाकडून देण्यात आली असून या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

पालघर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी निवासी डॉक्टर राहत नसल्याची ओरड नेहमीच होते. मात्र पालघर जिल्हा परिषद प्रशासन आणि सरकार यावर ठोस कारवाई करण्यात अजूनही अपयशी ठरत असल्याचं वारंवार समोर येत आहे. हा प्रकार न्यूज18 लोकमतने उघडकीस आणल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी तातडीने या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

(भरधाव कार घुसली रसवंतीगृहात, अकरा वर्षांच्या मुलाचा चिरडून मृत्यू; VIDEO VIRAL)

तसंच असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी जिल्हा परिषद पूर्ण काळजी घेईल अस आश्वासन देखील निकम यांनी दिलंय. तर पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागाचा आजही बोजवारा उडाला असून या जिल्ह्यात काम करणारे वैद्यकीय अधिकारी हे मुंबईत कुठल्यातरी ठिकाणी राहून इथला पगार घेतात असा आरोप करत या सगळ्यावर सरकार कारवाई करणार नसेल तर लवकरच आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे.

(CBIची टीम दारात, अधिकाऱ्याने इमारतीतून मारली उडी; 1 कोटीची बॅग फेकली, VIDEO VIRAL )

मागील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यकाळात रात्रीच्या वेळेस वैद्यकीय अधिकारी कर्मचारी निवासी ठिकाणी राहतात की नाही याची शहानिशा करण्यासाठी अचानक भेटी देऊन पाहणी केली जायची. मात्र सध्या पालघर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अतिरिक्त पदभार हा रवींद्र शिंदे यांच्याकडे आल्यापासून अशा तपासण्या झाल्याचं फारसं समोर आलेलं नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह पालघर जिल्हा जिल्हा परिषदेचा सावळा गोंधळ ही दिवसेंदिवस समोर येतोय.

First published:
top videos

    Tags: Marathi news, Palghar