• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मालक कुठे गेले? घराच्या ढिगारावर वाट पाहतोय कुत्रा, तळीये गावातला डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

मालक कुठे गेले? घराच्या ढिगारावर वाट पाहतोय कुत्रा, तळीये गावातला डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत त्याच्या मालकाचं अख्ख कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडल गेलं याची त्याला कल्पनाच नाही.

  • Share this:
तळीये, 30 जुलै : रायगड (raigad) जिल्ह्यातील तळीये गावात (Taliye landslide) अस्मानी संकटाने कहर केला. अनेकांची घरं जमीनदोस्त झाली असून अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. या दुर्घटनेतून तळीये गाव कसंबसं सावरत आहे. याच दरम्यान, कुत्र्याचा व्हिडीओ समोर आला आहे. आपल्या मालकाच्या घराच्या ढिगारावर हा कुत्रा गेल्या 8 दिवसांपासून बसून आहे. तळीये गाव दुर्घटनेला 8 दिवस होऊन गेले. परंतु या ठिकाणी गेले अनेक दिवस एक कुत्रा आपल्या मालकाच्या घराापासून हलत नाही. त्याच्या मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  एकाच ठिकाणी अशा परिस्थितीत बसून तो अतुरतेने आपल्या माणसाची वाट पाहत आहे. परंतु, दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत त्याच्या मालकाचं अख्ख कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडल गेलं याची त्याला कल्पनाच नाही. मुका प्राणी मात्र मोठ्या आशेने आपल्या माणसांची आतुरतेने वाट पाहत आहे. तर तीन कोंबड्या सुद्धा मालकाच्या जमीनदोस्त झालेल्या घरातच बसून आहेत. तळीये दुर्घटनेनंतर अनेक लोकांनी या घटनास्थळाला भेट दिली. ढिगाऱ्याखाली मृतदेह काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. माणसांची मोठ्या प्रमाणात वर्दळ या ठिकाणी होती. परंतु, अशा परिस्थितीत सुद्धा इमानी कुत्रा आपल्या माणसाच्या घरापासून तो हलला सुद्धा नाही. त्याच्या ओळखीचे जवळची माणसं दिसत नसल्याने तो आपल्या मालकाच्या घराच्या ढिगाऱ्यावर बसून जणू काही आपल्या माणसाची वाट पाहत आहे. तळीये गावातील शाळेतील 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू दरम्यान, तळीये गावावर 22 जुलै 2021 रोजी अचानक डोंगर कोसळला आणि 35 घरे जमिनीखाली गाडली गेली. यामध्ये 84 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मध्ये स्वरूपा कोंडाळकर, इशांत यादव, आयुष शिरावले, तन्वी कोंडाळकर, करण यादव, दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वर्षानुवर्ष ढाल बनून  तळीये  गावाचे संरक्षण करणारा डोंगर अचानक कोसळला आणि गावाचे होत्याचे नव्हते झाले संपूर्ण गाव जमीन खाली गाडलं गेलं. यामध्ये मोठ्या उमेदीने स्वप्न उराशी बाळगून जगणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचा सुद्धा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. दुकानावर डल्ला मारला पण गल्ला रिकामाच; निराश चोरट्यांनी काजू बदामावर मारला ताव शाळेच्या सर्व उपक्रमांमध्ये हिररीने भाग घेणारे विद्यार्थी  डोंगराने  गिळले  आहेत. या शाळेची सर्वात आवडती विद्यार्थिनी स्वरूपा कोंडालकर या विद्यार्थिनी व तिच्या मैत्रिणी दुर्घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच शिक्षकांसोबत सेल्फी काढला होता हा सेल्फी तिच्यासाठी शेवटचा ठरला. शाळेच्या सर्वच उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या या विद्यार्थीच्या दुर्दैवी मृत्यूने शिक्षका प्रमाणेच गावातील लोकसुद्धा हळहळ करत आहेत.
Published by:sachin Salve
First published: