विरार, 27 नोव्हेंबर : विरारमध्ये (virar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह (woman dead body) आढळून आला आहे. या महिलेची हत्या करून दगडाला बांधून मृतदेह फेकून देण्यात आला होता. या महिलेची ओळख अद्याप पटली नसून पोलीस तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेच्या मारंबळ पाडा जेटी नंबर 22 येथे शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह जेटी वर काम करणाऱ्या कामगारांना दिसून आल्यावर त्यांनी तात्काळ अर्नाळा पोलिसांना याची माहिती दिली.
video: तेजस्वीच्या बोलण्यावर सलमान भडकला; क्षणात केली बोलती बंद!
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. सदर महिलेची हत्या करून अंगाला दगड बांधून पाण्यात मृतदेह फेकला आहे. मृतदेह पूर्णता कुजलेल्या अवस्थेत असून चार ते पाच दिवसांपूर्वी महिलेची हत्या करून पाण्यात फेकला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
विरारच्या अर्नाळा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आता या संपूर्ण घटनेचा तपास अर्नाळा सागरी पोलीस करत आहेत.
भंडाऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या
दरम्यान, भंडाऱ्यात एका शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या (shivsena incumbent murder in bhandara) झाल्याची घटना समोर आली आहे. दिनेश बांते असं हत्या (Dinesh Bante Murder case) झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याचं नाव असून ते भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला गावातील उपसरपंच देखील आहे.
Hajj Yatra : हज यात्रेला कोण जाऊ शकतं? अशी आहे नियमावली
आधीच राज्यात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या होणाऱ्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापत असताना, यामध्ये आणखी एक भर पडली आहे. दवडीपार बेला गावातील उपसरपंच दिनेश बांते यांची काल रात्री दहाच्या सुमारास घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी बांते यांच्या घरात घुसून धारदार चाकुने त्यांच्यावर सपासप वार केले. . घराशेजारी राहणाऱ्या लोकांसोबत असलेल्या जुन्या भांडणातून सूड उगवण्यासाठी ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास भंडारा शहर पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.