Home /News /maharashtra /

राधाकृष्ण विखे पाटलांवर गुन्हा दाखल, अन्य 17 जणांवरही कारवाई

राधाकृष्ण विखे पाटलांवर गुन्हा दाखल, अन्य 17 जणांवरही कारवाई

विखे पाटलांसह 17 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शिर्डी, 1 ऑगस्ट : भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतत्वाखाली दूध दरवाढीसाठी राहाता येथे आंदोलन सुरू होतं. यावेळी जमावबंदीचा भंग केल्याने विखे पाटलांसह 17 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी दुधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी आजपासून राज्यभरात भाजप नेत्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. राहता इथंही असंच आंदोलन करण्यात आलं. मात्र यावेळी नगर मनमाड महामार्गावर रास्तारोकोही करण्यात आला. जमावबंदीचा भंग केल्याने विखे पाटील यांच्यासह माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिर्डीत भाजप जिल्हाध्यक्षासह माजी आमदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दूध दरवाढीसाठी नेवासा येथे रास्तारोको करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नितीन दिनकर यांच्यासह 35 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परवानगी नसताना रास्तारोको, जमावबंदीचा भंग यासह विविध कलमान्वये नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार 'भाजप सरकार मागील पाच वर्षांपासून सत्तेत होते. मात्र दूध उत्पादक शेतकरी व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत भाजप सरकारने कुठल्या उपाययोजना केल्या नसून आज भाजपने दूध दरवाढीविरोधात आंदोलन पुकारले आहे. हे भाजपाचे आंदोलन राजकीय आंदोलन असल्याचा टोला उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाजपला लगावला. पुणे जिल्ह्यातील मंचर येथील पराग उद्योग समूहाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व वळसे पाटील यांनी भेट दिली. तेव्हा ते बोलत होते.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Radhakrush

पुढील बातम्या