राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यासह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यासह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्रानी आणि अन्य शंभराहून अधिक जणांविरोधात पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

परभणी, 25 मे : राज्यात कोरोनाची भयंकर स्थिती निर्माण झालेली असताना लोकप्रतिनिधींनाच त्याचं गांभीर नाही का, असा प्रश्न निर्माण करणारी घटना पाथरी इथं घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्रानी आणि अन्य शंभराहून अधिक जणांविरोधात पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात जमावबंदीचे आदेश मोडून एकत्रित नमाज पठण केल्याबद्दल पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मुस्लीम बांधवांच्या पवित्र ईद या सणानिमित्त नमाज पठण केले जाते. पण कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यभरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करू नये, असे आदेश काढण्यात आले होते. तसंच सामूहिक नमाज पठणावर यावर्षी बंदी आणण्यात आली होती. पण विधिमंडळाचे सदस्य असलेल्या बाबाजानी दुर्रानी यांनीच कायदा मोडत हे कृत केलं आहे. आज पाथरी शहरांमध्ये 100 हून अधिक लोकांना जमा करत, नमाज पठण केले आणि त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पाथरी पोलिसात आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यासह 100 हून अधिक लोकांच्या विरोधात जमावबंदी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानपरिषद सदस्य असलेल्या बाबाजानी दुर्रानी, हे कायदे बनवणाऱ्या विधिमंडळाचे सदस्य आहेत. कायदा तयार करणाऱ्या सभागृहाचे सदस्य असूनही सरकारने लागू केलेला कायदा त्यांनी मोडल्याने लोकांमध्ये तीव्र भावना आहेत. याबाबत त्यांच्याविरोधात काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

भाजप आमदाराविरोधातही दाखल झाला होता गुन्हा

भाजपचे आमदार रमेश कराड यांनी गुरुवारी (21 मे) सकाळी 11.30 च्या सुमारास परळी येथील गोपीनाथ गडावर जाऊन भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. यावेळी आमदार रमेश कराड यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश झुगारून जमाव करून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केलं. यावेळी भाजपचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. याप्रकरणी आमदार रमेश कराड यांच्यासह 22 जणांवर परळी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 25, 2020, 8:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading