भरधाव कार पुलावरून नदीत पडली, प्रवाहात 3 जण वाहून गेले

भरधाव कार पुलावरून नदीत पडली, प्रवाहात 3 जण वाहून गेले

कारमधल्या एकाने बाहेर पडून पोहोत किनारा गाठला आणि जीव वाचवला. तर दोघे जण कारमध्ये पाण्यातच अडकले असून पोलीस शोध घेत आहेत.

  • Share this:

अनिस शेख, मावळ 1 ऑगस्ट : मावळ तालुक्यातील टाकवे गावात इंद्रायणी नदी पुलावरून जात असताना एक स्विफ्ट कार पुलाचा कठडा तोडून नदीत पडली. कार मधील एकाने पोहोत किनारा गाठत आपला जीव वाचवला तर दोघे जण कारमध्येच अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे सध्या इंद्रायणी नदीला भरपूर पाणी आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कार नेमकी कुठे आहे याचा पोलीस शोध घेताहेत.

निळ्या रंगाची स्विफ्ट कार कान्हे ते टाकवे रोडवर  इंद्रायणी नदीच्या पुलावरुन खाली नदी पात्रात पडली. भरधाव वेगाने ही कार येत होती. कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार नदीपात्रात कोसळली.

या कारमध्ये अक्षय संजय ढगे (20), संकेत नंदु असवले (20),  अक्षय मनोहर जगताप (20), असे तिघेजण होते. संकेत हा कार चालवत होता. यातल्या अक्षय हा कारमधून बाहेर पडला आणि पोहत किनाऱ्यावर आला. अजून दोन जण कारमध्ये अडकल्याची माहिती वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलीय. पोलिसांना मदतकार्यात शिवदुर्ग पथकही सहकार्य करत आहे.

10 वी-12 वीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

भाटघर धरणाजवळ STबसला अपघात

पुरंदर परिसरातल्या भाटघर धरणाजवळ आज एसटीच्या बसला अपघात झाला. संततधार पाऊस त्यामुळे कुंद झालेलं वातावरण आणि निसरडे रस्ते यामुळे गाडी चालवणं अवघड जात होतं. अशी अवघड वाटचाल करत असतानाच ड्रायव्हरचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बसने पलटी घेतली. यावेळी बसमध्ये 30 प्रवासी होते. त्यातले 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व प्रवाशांना खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आलंय.

तुला शेवटचं भेटायचंय...; हळदीपूर्वी एक्स बॉयफ्रेंडनं घेतला 'ती'चा जीव

ही बस भोरहून पुण्याकडे जात होती. पाऊस असल्याने गाडीचा वेग जास्त नव्हता. मात्र एका वळणावर चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि बसने पलटी घेतली. बस रस्त्याच्या कडेला जाऊन आडवी पडली. सुदैवाने बाजूला जास्त खोलगट भाग नसल्याने मोठा अनर्थ टळला. पलटलेली बस चिखलात जाऊन पडली. त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली सगळ्यांनी आरडाओरडा सुरू केला.

काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, तारीखही ठरली!

बस पूर्णपणे रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटल्याने रस्ता मोकळा होता आणि त्यावरून वाहतूकही सुरू होती. त्यामुळे लोकांनी थांबून मदतकार्यात सहभाग घेतला. गाडीचा दरवाजा खालच्या बाजूला दबल्याने सर्व प्रवाशांना खिडक्यांच्या काचा फोडून वाचविण्यात आलं. या अपघातात 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. नंतर दुसऱ्या एका बसने जखमी आणि इतर सर्व प्रवाशांना भोरला सोडण्यात आलं आणि जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय भोर येथे उपचारासाठी भरती करण्यात आलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 1, 2019, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading