अहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू

अहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू

नगर जिल्ह्यातील डॉन बॉस्को शाळेची सहल मुंबईला निघाली होती.

  • Share this:

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी

अहमदनगर, 17 जानेवारी: मुंबईकडे सहलीसाठी निघालेल्या एका शाळेच्या बसला जुन्नर तालुक्यातील  ओतुरमधील आळेफाटाजवळ बसला  भीषण अपघात झाला आहे. या अपघात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर विद्यार्थ्यांसह 20 जण जखमी झाले आहे.

नगर जिल्ह्यातील डॉन बॉस्को शाळेची सहल मुंबईला निघाली होती. रात्री 9.30 च्या सुमारास  ओतुरमधील आळेफाटापासून दहा किलोमीटर अंतरावर गायमुखवाडी याठिकाणी बसचे टायर फुटले आणि त्यावेळी समोरून येणाऱ्या एका व्हॅनला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, व्हॅनचा या चुराडा झाला तर बसचे समोरीला भागाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर बसला आगही लागली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बसचा क्लिनर आणि व्हॅनच्या ड्रायव्हरचा समावेश आहे. तर 15 ते 20 जण जखमी झाले आहे. यात 12 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या बसमध्ये 47 जण होते यात विद्यार्थी आणि शाळेचे शिक्षक, कर्मचारी होते.

जखमींना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

===============================

First published: January 17, 2019, 10:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading