पुण्यात मुलानेच केली आई वडिलांची हत्या

पुण्यात मुलानेच केली आई वडिलांची हत्या

एका मुलानेच आपल्या आई वडिलांची हत्या केली आहे. आई वडिलांची हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • Share this:

06 डिसेंबर:  पुण्यामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलानेच आपल्या आई वडिलांची हत्या केली आहे. आई वडिलांची हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

पुण्यातल्या मध्यवर्ती अशा शनिवारवाडा भागाजवळ हा प्रकार घडला आहे.  आशा क्षीरसागर आणि प्रकाश क्षीरसागर अशी मयत व्यक्तींची नावं आहेत. पराग क्षीरसागर असं मुलाचं नाव असून त्याचं वय 30 वर्षे आहे. या प्रकारामुळे पुण्यात खळबळ माजली आहे.  आज पहाटेची ही घटना आहे. आरोपी जखमी आहे, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचं कळतंय.  आरोपने आईवडिलांचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर स्वत: आत्महत्येचा प्रयत्न  केला आहे.

दरम्यान पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 11:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading