किशोर गोमासे, प्रतिनिधी
वाशिम, 01 जानेवारी : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाशिममध्ये (Washim) मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. कंटेनरने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
नागपूर-मुंबई या द्रुतगती महामार्गावर डव्हा फाटा ते खिर्डा दरम्यान भरधाव कंटेनरने मोटारसायकलला जबर धडक दिल्याने मोटारसायकल स्वार जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना आज नववर्षाच्या पहिल्या च दिवशी घडली आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लता दीदींनी केलं पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक
नागपूरवरून औरंगाबादकडे जात असलेल्या कंटेनर CG 04 DC 9195 ने विरुद्ध दिशेने येत असलेल्या MH 37 U 4084 या मोटार सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात ज्ञानदेव तुकाराम भोर ( वय 55, राहणार गोक सावंगी) हे जागीच ठार झाले तर त्यांच्या समवेत असलेला एक व्यक्ती जखमी झाला आहे.
नववर्षाच्या पहिली दिवशी दुर्दैवी घटना, वाघिणीसह 2 बछडे मृतावस्थेत आढळले
हा अपघात इतका भीषण होता की, कंटेनरच्या चाकाखाली दुचाकी सापडली. यात दुचाकीचा चुराडा झाला आहे. दुचाकीचालकाचा मृतदेह छिन्नविछीन अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. जखमी व्यक्तीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला असून कंटेनर महामार्गावर आडवा झाल्यानं दोन्ही बाजूकडून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कंटेनर हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. फरार कंटेनर चालकाचा शोध जऊळका पोलीस घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.