Home /News /maharashtra /

कोरोनाचा कहर थांबता थांबेना! मुंबई महापालिकेतून समोर आली धक्कादायक माहिती

कोरोनाचा कहर थांबता थांबेना! मुंबई महापालिकेतून समोर आली धक्कादायक माहिती

देशभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सर्वाधिक कहर महाराष्ट्रात आहे.

    मुंबई, 28 मे: देशभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सर्वाधिक कहर महाराष्ट्रात आहे. राज्यात एकूण 57000 हून जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यातही सर्वाधिक रुग्णसंख्या एकट्या मुंबईत आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितलं की, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) 1,529 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यत कोरोनामुळे 25 कर्मचाऱ्यांनी प्राण गमावला आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदा बीएमसीने ही आकडेवारी जाहीर केली आहे. हेही वाचा.. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आता खैर नाही, या शहरात रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात ग्रांट रोडवरील गोवालिया फायर स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या 56 वर्षीय फायरमनचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यात महापालिकेत किती कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तसेच किती जणांचा मृत्यू झाला, याबाबत कर्मचारी संघटनेने माहितीची मागणी केली होती. त्यांतर संयुक्त नगर आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) मिलिन सावंत यांनी 20 मे रोजी एक परिपत्रक जारी केले. त्यात कोरोनाबाधित कर्मचारी आणि मृतांच्या संख्येचा उल्लेख आहे. BMCने दिलेली माहिती अशी की, मुंबई फायर ब्रिगेड आणि सुरक्षा विभाग देखील कोरोनामुळे प्रभावित झाला आहे. फायर ब्रिगेडमध्ये जवळपास 35 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत दोन जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर सुरक्षा विभागात 80 हून कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे असून एकाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 105 जणांचा मृत्यू राज्यात बुधवारी एका दिवसातील सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले. 105 मृत्यूंसह मृतांची एकूण संख्या 1897 वर गेली आहे. 2190 नव्या रुग्णांसह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा रुग्णांची एकूण 56,948 वर गेला. राज्यात 964 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले असून बरे होणाऱ्यांची संख्या 17,918 झाली आहे. राज्यात 37,125 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. हेही वाचा.. लॉकडाऊननंतर स्थिरस्थावर व्हायला 9 ते 12 महिने लागतील, नवा अहवाल आला समोर दुसरीकडे, मुंबईत दिवसभरात 1002 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही 32 हजार 974 वर पोहोचली आहे. तर बुधवारी दिवसभरात 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 1065 वर पोहोचली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या